Prime Minister of Canada Justin Trudeau Dainik Gomantak
ग्लोबल

Justin Trudeau: कॅनडाच्या पंतप्रधानांचा 'भारत द्वेष'; आता भारतीय प्रतिकावर केली टीका

Justin Trudeau: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध मागील काही महिन्यांपासून बिघडलेले आहेत.

Manish Jadhav

Justin Trudeau: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध मागील काही महिन्यांपासून बिघडलेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन्ही दोशांतील संबंध बिघडले.

यातच आता, ट्रुडो यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ताज्या वादात त्यांनी हिंदूंच्या स्वस्तिक चिन्हाला द्वेष पसरवणारे म्हटले आहे. ट्रूडो यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ते संसदेजवळ द्वेषाचे प्रतीक प्रदर्शित करण्यास परवानगी देऊ शकत नाहीत.

ट्रुडो यांनी आज सकाळी ट्विट केले की, "जेव्हा आपण द्वेषपूर्ण भाषा आणि प्रतिमा पाहतो किंवा ऐकतो तेव्हा आपण त्याचा निषेध केला पाहिजे. पार्लमेंट (Parliament) हिलवर एखाद्या व्यक्तीद्वारा स्वस्तिकचे प्रदर्शन अस्वीकार्य आहे. कॅनेडियन लोकांना शांततेने एकत्र येण्याचा अधिकार आहे - परंतु आम्ही यहूदीविरोधी भावना, इस्लामोफोबिया किंवा कोणत्याही प्रकारचा द्वेष सहन करु शकत नाही.”

दुसरीकडे, सोशल मीडियावर (Social Media) लोक या ट्विटवर ट्रुडो यांच्यावर टीका करत आहेत. लोक म्हणाले की, स्वस्तिक चिन्ह पवित्रतेचे प्रतीक आहे, तर नाझी चिन्ह 'हेकेनक्रेझ' हे द्वेषाचे प्रतीक आहे. काही दिवसांपूर्वी जस्टिन ट्रुडो यांनी एका नाझी युद्ध गुन्हेगाराला संसदेत बोलावून सन्मानित केले होते. यानंतर चहूबाजूंनी टीका होत असताना कॅनडाच्या सभापतींना राजीनामा द्यावा लागला होता.

तसेच, जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत शीख दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.

ट्रुडो यांचा कल भारताविरोधात काम करणाऱ्या खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांकडे आहे. कॅनडाचे पंतप्रधान अनेक दिवसांपासून हिंदू चिन्ह स्वस्तिकवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. मात्र, याबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. यासंदर्भातील विधेयक कॅनडाच्या संसदेतही मांडण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT