Canadian opposition leader slams Justin Trudeau for straining ties with India over love for Khalistan. Dainik Gomantak
ग्लोबल

खलिस्तानच्या प्रेमात भारतासोबत संबंध बिघडवले, कॅनडाच्या विरोधी पक्षनेत्यांनी Justin Trudeau यांना फटकारले

India Canada Row: "आपले भारत सरकारशी व्यावसायिक संबंध असणे आवश्यक आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आणि मी या देशाचा पंतप्रधान झाल्यावर ते पुन्हा प्रस्थापित करेन."

Ashutosh Masgaunde

Canadian opposition leader slams Justin Trudeau for straining ties with India over love for Khalistan:

कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानच्या प्रेमात पडून भारतासोबतचे संबंध बिघडवले आहेत आणि आता परिस्थिती अशी आहे की, गेल्या आठवड्यात भारताच्या कठोर भूमिकेनंतर कॅनडाने 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतातून माघारी बोलवावे लागले आहे.

जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा संबंध भारताशी जोडून दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच बिघडवले आहेत.

पण, आता कॅनडाचे मुख्य विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी जस्टिन ट्रुडो यांना मोठा धक्का दिला असून, ते कॅनडाचे पुढचे पंतप्रधान झाल्यास भारतासोबतचे संबंधांमध्ये सुधारणा करणार असल्याची घोषणा केली आहे.

हिंदू आणि हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असे पियरे पॉइलीव्हरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्यांचा स्पष्ट संदर्भ खलिस्तान्यांकडे होता, जे कॅनडातील हिंदू मंदिरांवर अनेकदा हल्ले करतात.

कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना आठ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर भारतासोबतच्या ताणलेल्या संबंधांची किंमत नसल्याचे म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, जेव्हा ते कॅनडाच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील तेव्हा ते भारत आणि कॅनडामधील संबंध पूर्ववत करतील.

पॉइलीव्हरे नमस्ते रेडिओ टोरंटोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "आपले भारत सरकारशी व्यावसायिक संबंध असणे आवश्यक आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आणि मी या देशाचा पंतप्रधान झाल्यावर ते पुन्हा प्रस्थापित करेन."

कॅनडाच्या मुख्य विरोधी नेत्याला नवी दिल्लीतून 41 कॅनेडियन मुत्सद्दींच्या हकालपट्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यासाठी जस्टिन ट्रुडो यांना जबाबदार धरले. या घटनेसाठी त्यांनी जस्टिन ट्रुडो यांना 'अक्षम आणि अव्यावसायिक' म्हटले आहे.

ते म्हणाले की, कॅनडा आता भारतासह जगातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शक्तीशी मोठ्या वादात आहे.

कॅनडातील हिंदू मंदिरांच्या तोडफोडीच्या वृत्तांबाबत, कॅनडाचे मुख्य विरोधी पक्षनेते म्हणाले, "माझा विश्वास आहे की, जे लोक हिंदू मंदिरांमधील मालमत्तेचे नुकसान करतात किंवा लोकांचे नुकसान करतात त्यांना जबाबदार धरले पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे."

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यात "संभाव्य संबंध" असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केल्यानंतर भारत आणि कॅनडाचे राजनैतिक संबंध ताणले गेले.

जून महिन्यात कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी निज्जरची हत्या केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मोले येथे ट्रक कलंडला!

Goa BJP: तानावडेंसमोर तवडकर ठाम! समजूत काढण्यासाठी आता पुढच्या आठवड्यात बैठक

Cuchelim: 'कुचेली कोमुनिदाद'बाबतीत गोवा खंडपीठ गंभीर! कारवाईचे दिले निर्देश; 'ती' 4 घरे पाडली जाणारच

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

SCROLL FOR NEXT