USA America  Dainik Gomantak
ग्लोबल

न्यूयॉर्क शहरात नवे संकट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; लोकांनी पोस्ट केले व्हिडिओ

कीटकांमुळे गंभीर आजार होऊ शकतात असा काही लोक दावा करत आहेत. तर काही लोक संसर्गाची तुलना प्लेगशी देखील करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात लहान पंख असलेल्या किटकांनी धुमाकूळ घातला आहे. किटकांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर या कीटकांचे फोटो व्हायरल होत आहेत.

कीटकांमुळे गंभीर आजार होऊ शकतात असा काही लोक दावा करत आहेत. तर काही लोक संसर्गाची तुलना प्लेगशी देखील करत आहेत.

मॅनहॅटन, ब्रुकलिनच्या आसपास असणारे लहान कीटक पादचारी आणि सायकलस्वारांसाठी उपद्रव बनले आहेत. या कीटकांनी मेट्रो प्लॅटफॉर्म, मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणे त्यांचे निवासस्थान केले आहे. या किड्यांबद्दल स्थानिक लोक सोशल मीडियावर जोरदार भाष्य करत आहेत.

एका ट्विटर युजरने उडणाऱ्या कीटकांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. हे कीडे आपल्या सर्वांसाठी एक नवीन समस्या बनले आहेत. लहान असल्याने ते आपल्या केसात, कपड्यात आणि नाकातही शिरत आहेत. हे कीटक डासांपेक्षा लहान असल्याचा दावा युजरने केला आहे.

आणखी एका युजरने याबाबत ट्विट केले आहे. न्यूयॉर्कमध्ये काय चालले आहे ते कोणी सांगू शकेल का? सुरुवातीला मला वाटले की हा खराब हवेच्या गुणवत्तेमुळे होत आहे, परंतु नंतर मला समजले की माझ्या शरीरावर असलेले हे सर्व लहान कण कीटक आहेत.

शहरात दिसणारे हे कीटक पंख असलेले ऍफिड आहेत. असे असोसिएटेड प्रेसच्या हवाल्याने सिटी युनिव्हर्सिटीचे कीटकशास्त्रज्ञ प्रोफेसर डेव्हिड लोहमन यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. कोरी मॉरो यांनी म्हटले आहे की, अचानक ऍफिडचा हल्ला असामान्य आहे, परंतु घाबरण्याचे कारण नाही. हा हवामानाचा परिणाम आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

ऍफिड्सबद्दल मनोरंजक गोष्ट अशी आहे की ते सामान्यतः पार्थेनोजेनेटिक असतात, म्हणजे मादी मादींना जन्म देतात जेणेकरून त्यांची लोकसंख्या योग्य पर्यावरणीय परिस्थितीत वाढू शकेल. असे मोरो म्हणाले आहेत.

उच्च तापमान, वाढलेली आर्द्रता आणि नुकताच झालेला पाऊस हे या संसर्गाचे कारण आहे. कीटकांचा उपद्रव होत असला तरी, कीटकांमुळे आरोग्याला धोका नाही. असे न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT