सुकण्यासाठी ठेवलेल्या अंडरवियर व्हायच्या गायब, 8 महिने सुरू होता प्रकार; महिलेने केले स्टिंग ऑपरेशन अन् हाणामारी झाली

30 वर्षीय महिलेने शेजाऱ्यावर आठ महिन्यांपासून अंडरवियर चोरी करत असल्याचा आरोप केला.
Dhandhuka Ahmedabad
Dhandhuka AhmedabadDainik Gomantak
Published on
Updated on

अहमदाबादच्या धंधुका तालुक्यातील एका गावात महिलेच्या अंतर्वस्त्र चोरीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. यात दहाजण जखमी झाले आहेत. अंडरगारमेंट्सच्या चोरीवरून झालेल्या गोंधळात पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे.

पंचम गावात 27 जून रोजी दोन गटांमधील वाद झाला. येथील 30 वर्षीय महिलेने शेजाऱ्यावर आठ महिन्यांपासून अंडरवियर चोरी करत असल्याचा आरोप केला.

महिला अंतर्वस्त्र सुकविण्यासाठी बाहेर टाकत होती दरम्यान, ते गायब व्हायची त्यामुळे तिला आश्चर्यचा धक्का बसला. महिलेने चोरट्याला रंगेहाथ पकडण्यासाठी मोबाईल द्वारे स्टिंग ऑपरेशन केले. यानंतर फुटेजमधून अखेर सत्य बाहेर आले. तिचा शेजारी उघडपणे तिचे अंतर्वस्त्र चोरत आहे असे 26 जून रोजी फुटेज पाहिल्यावर समोर आले आहे.

'दुसऱ्या दिवशी महिलेने गुपचूप त्या व्यक्तीवर नजर ठेवली आणि त्याला तिचे अंतर्वस्त्र चोरताना पाहिले. त्यानंतर महिलेने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्याजवळ चोरलेले अंतर्वस्त्र सापडले. अशी माहिती पोलिसांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिली आहे.

दरम्यान, चिडलेल्या शेजाऱ्याने महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

Dhandhuka Ahmedabad
TCS कंपनीत जॉबच्या नावाखाली 100 कोटी रुपयांचा घोटाळा; RMG संबधित घोटाळा नेमका काय? जाणून घ्या सविस्तर

विनयभंगाच्या घटनेवरून महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यावर तिचे कुटुंबीय लाठ्या घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या व्यक्तीवर आणि त्याच्या नातेवाईकांवर हल्ला केला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सूडबुद्धीने महिलेच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.

या हाणामारीत सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या सुमारे 20 जणांना अटक केली आहे. महिलेच्या नातेवाइकांवर दंगल आणि मारहाणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर अंडरगारमेंट चोरणाऱ्या शेजारी आणि त्याच्या नऊ नातेवाईकांवर विनयभंग, मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com