UK News: एक पुरस्कारप्राप्त भारतीय वंशाच्या शाळकरी मुलाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने रशियन आक्रमणामुळे विस्थापित झालेल्या युक्रेनियन मुलांना यूकेमध्ये गोळा केलेली पुस्तके आणि इतर स्टेशनरी साहित्य देण्यासाठी त्याच्या पालकांसह पोलंडला गेला आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन संघर्षाच्या वर्धापन दिनापूर्वी पॉल कुमार या आठवड्याच्या सुरुवातीला पोलिश शहरात क्राको येथे पोहोचला. स्थानिक वृत्तानुसार, कुमार आणि त्याच्या कुटुंबीयांनी युनिसेफच्या (UNICEF) सहकार्याने आयोजित 'मीटिंग पॉइंट इंटिग्रेशन सेंटर' ला भेट दिली. हे केंद्र झुस्ट्रिक्स फाउंडेशनकडून चालवले जात आहे.
या मानवतावादी मोहिमेदरम्यान कुमारने ट्विट केले की, "सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी बरेच नवीन मित्र बनवले, ज्यांना मी पुन्हा भेटणार आहे. बोल्टन आणि केंद्राजवळील एका कार्यक्रमादरम्यान मी गोळा केलेल्या रंगीत पेन्सिल, मार्कर आणि पेंटिंग्ज त्यांना दिल्या. जेणेकरुन पोलंड (Poland) आणि युक्रेनची मुले त्यांचा वापर करु शकतील.''
तसेच, कुमारच्या मानवतावादी मिशनला टेस्को कर्मचारी आणि राष्ट्रीय साक्षरता ट्रस्टसह अनेक संस्थांचे समर्थन आहे.
कुमारने निधी उभारण्यासाठी वाहने धुतली. गेल्या वर्षी 'युक्रेन स्कूल्स अपील'ला आपला पॉकेटमनी दान केला होता. अशा प्रकारे निधी उभारण्याच्या त्याच्या प्रयत्नांसाठी त्याला 'प्रिन्सेस डायना अवॉर्ड 2022' मिळाला आहे. लंडनस्थित 'सोशल अँड ह्युमॅनिटेरिअन अॅक्शन'चा इव्हिलचा तो अॅम्बेसेडर देखील आहे.
2020 मध्ये, त्याला कोविड लॉकडाऊन दरम्यान 'कोविड ख्रिसमस परेड' या स्व-प्रकाशित पुस्तकाद्वारे सामाजिक कारणांसाठी निधी उभारल्याबद्दल ब्रिटीश पंतप्रधानांचा 'पॉइंट ऑफ लाइट अवॉर्ड' देण्यात आला. कोविड-19 मुळे ज्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे, अशा मुलांना मदत करण्यासाठी कुमारने राष्ट्रीय साक्षरता ट्रस्टसाठी निधी उभारला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.