Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाबाबत नास्त्रेदमसची मोठी भविष्यवाणी, जाणून घ्या...

World War: रशिया आणि युक्रेन युद्धाला 1 वर्ष पूर्ण होत असले तरी अजूनही हल्ले सुरुच आहेत. युद्ध अजून संपलेले नाही.
Ukraine Russia war
Ukraine Russia warDainik Gomantak
Published on
Updated on

World War: रशिया आणि युक्रेन युद्धाला 1 वर्ष पूर्ण होत असले तरी अजूनही हल्ले सुरुच आहेत. युद्ध अजून संपलेले नाही. संपूर्ण जगात या युद्धाची चर्चा सुरु आहे, संपूर्ण जगाला आता हे युद्ध संपावे असे वाटत असले तरी या दिशेने ठोस पावले उचलली गेली नाहीत.

दरम्यान, रशियाने वर्षभरापूर्वी युक्रेनवर (Ukraine) हल्ला केला तेव्हा युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे युद्ध सुरु झाले. रशियाच्या हल्ल्यानंतर तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चेला उधाण आले होते.

या युद्धाचे रुपांतर तिसर्‍या महायुद्धात होईल, असे त्यावेळी अनेक तज्ञांनी म्हटले होते, कारण दोन्ही देशांमध्ये जे काही चालू आहे ते लक्षात घेऊन तज्ञांनी आपले मत दिले होते. बरेच नुकसान होऊनही दोन्ही बाजू करारासाठी तयार होत नाहीत.

Ukraine Russia war
Russia Ukraine War: बायडन यांच्या युक्रेन दौऱ्यावर भडकले पुतीन, 'आम्ही ही समस्या शांततेने...'

दुसरीकडे, नास्त्रेदमच्या त्या भविष्यवाण्यांचा उल्लेख आता समोर येत आहे. त्यानुसार 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होणार आहे. नास्त्रेदमसने 2023 साली तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती, पण तरीही तज्ञ संभ्रमात आहेत.

हे भाकीत रशिया, युक्रेन किंवा चीन (China) आणि तैवानच्या संदर्भात आहे हे त्यांना समजत नाही. मात्र, सध्या त्याचा संबंध रशिया आणि युक्रेनमधील युद्धाशी जोडला जात आहे.

1 वर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला

24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन रणगाडे युक्रेनमध्ये दाखल झाले. त्यामुळे सर्वसामान्यांना बंकरमध्ये लपावे लागले. युद्धाच्या सुरुवातीपासून जगभरातील सरकारांनी रशियावर कडक निर्बंध लादले, पण पुतिन यांच्यावर त्याचा विशेष परिणाम दिसून आला नाही.

पुतिन यांनी हल्ला सुरुच ठेवला. पुतीन यांचे अजूनही युक्रेनच्या मोठ्या भागावर नियंत्रण आहे. तर युक्रेनने व्यापलेल्या भूभागाच्या मोठ्या भागातून रशियन सैन्याला हुसकावून लावण्यात यश आले आहे. या युद्धामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

Ukraine Russia war
Russia-Ukraine War: भारत हे युद्ध थांबवणार? अमेरिकेने केले मोठे वक्तव्य

तसेच, या युद्धाचा युक्रेनला सर्वाधिक फटका बसला आहे. हजारो नागरिक आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय 8 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. या युद्धाचा परिणाम केवळ युक्रेन आणि रशियावरच नाही तर संपूर्ण जगावर दिसून येत आहे.

शिवाय, या युद्धामुळे जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. महागड्या कच्च्या तेलामुळे संपूर्ण जगाचा पुरवठा विस्कळीत झाला असून आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळेच हे युद्ध आणखी वाढू नये असे जगाला वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com