Liz Truss
Liz Truss  Twitter
ग्लोबल

UK PM New Liz Truss: ऋषी सुनक यांचा पराभव करुन लिझ ट्रस बनल्या ब्रिटनच्या पंतप्रधान

दैनिक गोमन्तक

Britain PM Election Result: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा निकराच्या स्पर्धेत पराभव केला. लिझ ट्रस मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ट्रस यांना 81,326 आणि ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले. निवडणूक निकालापूर्वी आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ब्रिटनच्या (Britain) नवीन पंतप्रधानपदाची निवडणूक जुलैमध्ये सुरु झाली, जेव्हा बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या सरकारमधील अनेक घोटाळे आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेली राजकीय कसरत आज संपली. ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाला.

दुसरीकडे, जेव्हा ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, "मी कंझर्व्हेटिव्ह सरकारला सर्व प्रकारे पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. आम्ही नुकतीच ही मोहीम पूर्ण केली आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT