Rishi Sunak  Dainik Gomantak
ग्लोबल

Rishi Sunak: ऋषी सुनक यांना हुजुर पक्षातील 100 नेत्यांचा पाठिंबा

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; विरोधी मजुर पक्षाच्या लोकप्रियतेत 25 टक्के वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Rishi Sunak: लिज ट्रस (Liz Truss) यांनी 20 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनमधील राजकीय अडचणी वाढल्या आहेत. आता देशात पुन्हा एकदा पंतप्रधान निवडला जाणार आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांचे नाव सर्वात आघाडीवर त्यांना हुजूर पक्षाच्या 100 नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

भारतीय मूळ असलेले ऋषी सुनक यांच्यासह या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरीस जॉनसन आणि हाऊस ऑफ कॉमन्सच्या सभापती पेनी मोर्डौंट यांचाही समावेश आहे. तथापि, अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सुनक यांनी बाजी मारली आहे. त्यांना नामांकनासाठी गरजेच्या असलेल्या हुजूर पक्षातील 100 नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

24 ऑक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी हुजूर पक्षाने एका आठवड्यात नव्या पंतप्रधानांना शपथ देणे गरजेचे आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया पुर्ण करून नेता निवडीचे काम वेगाने करण्यासाठी राजकीय हालचीलांना वेग आला आहे.

निवडणूक झाल्यास हुजुर पक्ष पराभूत होणार

दरम्यान, एका सर्व्हेनुसार जर ब्रिटनमध्ये सद्यस्थितीत निवडणूक झाली तर हुजूर पक्षाचा पराभव होऊ शकतो, असे समोर आले आहे. त्यामुळे पक्षाला सध्या निवडणूक नको आहे. वारंवार पंतप्रधान बदलल्याने हुजूर पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. तर विरोधी मजुर पक्षाची लोकप्रियता 25 टक्क्यांनी वाढली आहे. तथापि, ब्रिटनमध्ये निवडणुकीत अद्याप दोन वर्षांचा अवधी आहे.

लिझ ट्रस या आर्थिक आघाडीवर अपयशी ठरल्या. दुसरीकडे सुनक हे प्रोफेशनल बँकर आहेत. जॉनसन सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. त्यांनी दिलेल्या बेल आऊट पॅकेजचे मध्यमवर्गियांनी कौतूक केले होते. ऋषी सुनक यांच्यामुळे हुजुर पक्षाला आशा वाटते. नुकतेच निवडणूक काळात ते सतत लोकांमध्ये मिसळत होते. त्यामुळेच लोकांच्या मनात पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांची प्रतिमा अजूनही ठळक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Xelvan Jetty: 'शेळवण जेटी' प्रकल्पाला कडाडून विरोध! पणजीत निदर्शने; पाटकर काब्राल शाब्दिक द्वंद्व

Maha Andolan: आझाद मैदानावर शेकडो नागरिक एकवटले! 39 A विरोधात महाआंदोलन; पोलिसांचा कडेकोट पहारा

Viral Video: 'विषयच हार्ड'! पठ्ठ्यांनी बनवली 6 चाकांची बाईक, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'हे टेक्निक देशाबाहेर जाता कामा नये!'

Arijit Singh Ek Din Song: 'अरिजीत सिंग इज बॅक'! नवीन गाणे घालते आहे धुमाकूळ; आमिर खानने भेटून केला चमत्कार Watch Video

Arambol Beach: "गोवा पूर्वी किती भारी होता"! हरमल बीचचे 1980 सालचे फोटो Social Media वर व्हायरल; पर्यटक झाले इमोशनल Watch Photos

SCROLL FOR NEXT