First Female Lord Chief Justice After 755 Years: ब्रिटनची पुढील लॉर्ड चीफ जस्टिस एक महिला असेल. 755 वर्षांनंतर पहिल्यांदाच हे घडत आहे, कारण या पदाच्या स्थापनेनंतर आजपर्यंत एकही महिला या पदावर विराजमान झालेली नाही.
दोन महिला (Women) न्यायाधीश या पदासाठी उमेदवार आहेत. यामध्ये 58 वर्षीय डेम स्यू कार आणि 67 वर्षीय डेम व्हिक्टोरिया शार्प यांचा समावेश आहे. 'लॉर्ड चीफ जस्टिस' हे टायटल सध्या फक्त पुरुष न्यायाधीशांसाठी वापरले जाते.
दरम्यान, लॉर्ड चीफ जस्टिस हे पद पहिल्यांदा 1268 मध्ये निर्माण करण्यात आले. 100 हून अधिक पुरुष न्यायाधीशांनी हे पद भूषवले आहे.
लॉर्ड चान्सलर आणि न्याय सचिव अॅलेक्स चाक येत्या दोन आठवड्यांत पहिल्या महिला लॉर्ड चीफ जस्टिसच्या नावाची घोषणा करतील, असे सांगण्यात येत आहे. चाक आणि पंतप्रधानांच्या निर्णयाला ब्रिटनचे राजे अनुमोदन देतील.
दुसरीकडे, लॉर्ड चीफ जस्टिससाठी डेम व्हिक्टोरिया शार्प आघाडीवर आहेत. ज्यांचे जुळे बंधू गोल्डमन सॅक्सचे माजी फायनान्सर रिचर्ड शार्प आहेत, ज्यांनी गेल्या महिन्यात बीबीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
त्याचवेळी, डेम सू यांची प्रतिमा क्लीन असल्याचे सांगितले जात आहे. एप्रिल 2020 पासून त्या अपीलीय न्यायालयाचे (Court) न्यायाधीश आहेत. लोकाभिमुख कर्तव्ये पार पाडण्यासाठी, त्याचबरोबर सरकार आणि लॉर्ड चॅन्सलर यांच्यात समन्वय साधण्यासाठी त्या अधिक योग्य असतील असे एका कायदेतज्ज्ञाने सांगितले आहे.
बकिंगहॅमशायरमधील ट्रिनिटी कॉलेज केंब्रिज आणि वायकॉम्बे अॅबे स्कूलमध्ये शिकलेल्या डेम स्यू म्हणतात की, स्त्रीवाद म्हणजे "निवडीचे खरे स्वातंत्र्य".
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.