Queen Elizabeth II Dainik Gomantak
ग्लोबल

Queen Elizabeth II Death: ब्रिटनची राणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन

Britain Queen Elizabeth II Paas Away: ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Britain Queen Elizabeth II Paas Away: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी स्कॉटलंडमधील बालमोरल पॅलेस येथे निधन झाले. आज त्यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांचे पुत्र आणि वारस प्रिन्स चार्ल्स, त्यांची पत्नी कॅमिला आणि नातू प्रिन्स विल्यम हे बालमोरलमध्ये पोहोचले आहेत, असे क्वीन्स क्लेरेन्स हाऊस आणि केन्सिंग्टन पॅलेस कार्यालयांनी सांगितले.

दरम्यान, राणी एलिझाबेथ द्वितीय यांना डॉक्टरांच्या (Doctors) देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. 70 वर्षांपासून त्या सिंहासनावर विराजमान होत्या. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर स्कॉटलंडमधील (Scotland) बालमोरल कॅसलमध्ये उपचार सुरु होते. या ठिकाणी त्यांचे कुटुंबीयही पोहोचले होते. काही काळापासून त्या बकिंगहॅम पॅलेस सोडून स्कॉटिश राजवाड्यात वास्तव्यास आल्या होत्या. नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

दुसरीकडे, राणी एका बैठकीत त्यांच्या राजकीय सल्लागारांना भेटणार होत्या. परंतु डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राजकीय सल्लागारांसोबतची बैठक रद्द करण्यात आली होती. बकिंगहॅम पॅलेसमधील गार्ड चेंजिंग सिरेमनीही रद्द करण्यात आली होती. त्या जागी एक बोर्ड लावण्यात आला होता. गेल्या वर्षाभरापासून राणीला चालताना त्रास होत होता. त्यांना क्वचितच उभा राहता येते होते.

क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोनाची लागण झाली होती

फेब्रुवारीमध्ये राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत सुधारली होती. परंतु त्यांना चालण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT