Princess Diana Dainik Gomantak
ग्लोबल

प्रिन्सेस डायनाच्या स्वेटरचा 9 कोटींना लिलाव... एवढं काय विशेष होतं त्यात!

जगभरातील सर्वात महागडे कपडे लोक खरेदी करताना दिसत असले तरी आता जगातील सर्वात महागड्या स्वेटरची खरेदी करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Princess Diana: आजच्या पिढीला ब्रँडेड कपडे खरेदी करायला आवडतात. जर तुम्ही शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडत असाल तर तुमच्या खिशात किमान 10,000 रुपये असणे आवश्यक आहे.

जगभरातील सर्वात महागडे कपडे लोक खरेदी करताना दिसत असले तरी आता जगातील सर्वात महागड्या स्वेटरची खरेदी करण्यात आली आहे.

या स्वेटरचा नऊ कोटी रुपयांना लिलाव झाला. नुकताच हा लिलाव अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झाला. स्वेटर नवीन नव्हता, खरे तर तो 42 वर्ष जुना होता आणि तो कोणीतरी परिधान केला होता.

हा स्वेटर ब्रिटनची राजकुमारी डायना हिचा होता

दरम्यान, हा स्वेटर इतर कोणाचा नसून ब्रिटनच्या (Britain) राजकुमारी डायनाचा होता. डायनाने 1981 मध्ये पोलो सामन्यात हाताने विणलेला हा स्वेटर परिधान केला होता. त्यावेळी प्रिन्स चार्ल्सही तिच्यासोबत सामन्यादरम्यान दिसला होता.

न्यूयॉर्कमधील सोथेबी येथे झालेल्या ऑनलाइन लिलावात एका अज्ञात व्यक्तीने $1.1 दशलक्षमध्ये विकत घेतले होते, म्हणजे खरेदीदाराचे नाव अद्याप उघड झालेले नाही.

31 ऑगस्टपासून लिलाव सुरु झाला

दुसरीकडे, 31 ऑगस्ट 2023 रोजी स्वेटर लिलाव सुरु झाला होता. अखेरपर्यंत लिलाव 2 लाख डॉलरपेक्षा कमी राहिला. स्वेटरच्या किमतीचा अंदाज $50 हजार ते $80 हजार एवढा लावण्यात आला होता, पण अखेरच्या क्षणी अचानक सर्वकाही बदलले. \

लिलावाची बोली 8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आणि शेवटी एका व्यक्तीने तो 8.24 कोटी रुपयांना विकत घेतला.

स्वेटरच्या लिलावात सर्व विक्रम मोडले

प्रिन्सेस डायनाच्या स्वेटरच्या लिलावाने विद्यमान लिलावाचा विक्रम मोडला आहे, जो कर्ट कोबेनच्या ग्रीन स्वेटरच्या नावावर होता. हा 2019 मध्ये US$334,000 मध्ये खरेदी केला गेला होता.

डायनाशी संबंधित संस्मरणीय गोष्टींपैकी एक, तिचा गाऊन जानेवारी 2023 मध्ये सोथेबीने US $ 604,800 मध्ये विकला होता, जो पूर्वीचा विक्रम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

SCROLL FOR NEXT