Liz Truss  Twitter
ग्लोबल

Liz Truss: 'मी अणुबॉम्बचं बटण दाबायला तयार', पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचं वादग्रस्त वक्तव्य

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत लिझने मोठे वक्तव्य केले

दैनिक गोमन्तक

Britain PM Election: ब्रिटनमध्ये सध्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी लिझ ट्रस रिंगणात आहेत. दोन्ही नेते बोरिस जॉन्सन ची जागा घेण्याच्या शर्यतीत आहेत. निवडणूक प्रचारात दोघेही मोठ मोठी भाषणे करत आहेत. दरम्यान, लिझ ट्रसने या भाषणांदरम्यान, एक मोठे वक्तव्य केल्याने त्या सध्या चर्चेत आहे. रशिया, युक्रेन आणि अणुबॉम्बमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत लिझने हे वक्तव्य केले आहे.

खरं तर, ऋषी सुनक आणि लिझ ट्रस हे दोघेही स्वतःसाठी जोरदार प्रचार करत आहेत. या दरम्यान, लिझ ट्रस यांनी बर्मिंगहॅममधील एनईसी हेस्टिंग्ज कार्यक्रमात, 'गरज पडेल तेव्हा अणुबॉमचे बटण दाबायला तयार असेल मागे हटणार नाही,' असे कार्यक्रमाच्या सूत्रधाराने त्यांना आण्विक युद्धाशी संबंधित निर्णयाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हे सांगितले. पंतप्रधान झाल्यास अणुयुद्ध करण्यास तयार असेल, भावनिक निर्णय न घेता प्रॅक्टिकली विचार करून आण्विक हल्ल्याचा आदेश देईल. मात्र, हा पर्याय नसून पंतप्रधानांचे कर्तव्य असेल, मी यासाठी नेहमीच तयार राहीन असे लिझ यांनी सांगितले.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतांना लिझ यांनी हे वक्तव्य करून रशिया अध्यक्ष पुतीनवर निशआना साधना आहे. यापूर्वीही ट्रस यांनी पुतिन यांच्या विरोधात उभे राहण्याचा मानस व्यक्त केला होता. फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर ब्रिटनचे अणुबॉम्ब हाय अलर्टवर असल्याचेही सांगण्यात आले.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. मात्र, लिझ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. दुसरीकडे ऋषी सुनक यांनी आपल्या निवडणूक प्रचारात मी शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक मतासाठी लढत राहणार असल्याचे सांगितले. निवडणूक प्रचारादरम्यान गेल्या 30 दिवसांत सुनक यांनी 16000 पक्ष सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 100 कार्यक्रम केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT