King Charles Dainik Gomantak
ग्लोबल

King Charles: पैसे घेऊन नागरिकत्व मिळवल्याचा आरोप, वाचा ब्रिटन किंग चार्ल्सचे वादग्रस्त प्रकरणं

प्रिन्स चार्ल्स राजघराण्यातील एक असे सदस्य आहे ज्यांच्या प्रेम आणि वादाच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. ज्यांची केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर जगभरात चर्चा झाली.

दैनिक गोमन्तक

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे नवे राजे बनले आहेत. त्यांना किंग चार्ल्स-III असे संबोधले जाईल. त्याच वेळी, त्यांची पत्नी कॅथरीन यांना आता डचेस ऑफ कॉर्नवॉल म्हटले जाईल. प्रिन्स चार्ल्स राजघराण्यातील एक असे सदस्य आहे ज्यांच्या प्रेम आणि वादाच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. ज्यांची केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर जगभरात चर्चा झाली.

24 जुलै 1981 रोजी चार्ल्सचे लग्न 13 वर्षांनी लहान असलेल्या डायना स्पेन्सरशी झाले असले तरी चार्ल्सचे कॅमिला पार्कर बोल्झ नावाच्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. असे म्हटले जाते की डायनाला हे माहित होते आणि तिला लग्न मोडायचे होते, परंतु राजघराण्याविरोधात जाण्याचे मोठे पाऊल उचलण्याचे धाडस ती करू शकली नाही.

डायनापासून घटस्फोट ते कॅमिलाशी लग्न

प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांनी अखेरीस 1996 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर कॅमिलाने लग्न केले. या लग्नानंतरही चार्ल्सचे नाव अनेक महिलांसोबत जोडले गेले आणि ते चर्चेत राहिले. यामध्ये स्पेनमधील ब्रिटिश राजदूताची मुलगी जॉर्जियाना रॅचेल, आर्थर वेलेस्ली, मॉडेल फिओना वॉटसन, लेडी जेन वेलस्ली, ड्यूक ऑफ वेलिंग्टनची मुलगी, डेविना शेफील्ड, लेडी सारा स्पेन्सर, लक्झेंबर्गची राजकुमारी मारिया अॅस्ट्रिड आणि इतर अनेक महिलांचा समावेश आहे.

पैसे घेऊन नागरिकत्व मिळवण्यात नाव समोर

चार्ल्सची प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड नावाची स्वतःची धर्मादाय संस्था आहे. धनाढ्यांकडून पैसे घेऊन त्यांना नागरिकत्व देण्याचे काम त्यांच्या संस्थेने केल्याचा आरोप चार्ल्सवर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी हे प्रकरण चर्चेत आले होते जेव्हा ब्रिटनमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र 'डेली मेल' आणि 'द संडे टाईम्स' यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती. प्रिन्स चार्ल्सची संस्था इतर देशांतील लोकांकडून पैसे घेऊन नाइटहूड सन्मान आणि नागरिकत्व देण्याचे काम कसे करत आहे, हे या अहवालात सांगण्यात आले आहे.

एवढेच नाही तर याचा पुरावा देण्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात सौदी अरेबियाच्या नागरिकाशी संबंधित अशी कागदपत्रे सादर करण्यात आली होती ज्यामुळे याची पुष्टी होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर चार्ल्स यांना त्यांच्या संस्थेतील वरिष्ठ पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दहशतवादी बिन लादेनच्या कुटुंबाकडून मिळालेली देणगी स्वीकारली

पैसे घेऊन नागरिकत्व दिल्याच्या प्रकरणात चार्ल्सचे नावच पुढे आले नाही, तर इतरही अनेक आरोप झाले. चार्ल्सने 2013 मध्ये दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या कुटुंबाकडून देणग्या स्वीकारल्याचा आरोप आहे. प्रिन्स चार्ल्स यांनी लंडनमध्ये लादेनचे सावत्र भाऊ शेख बकर आणि शफीक बिन लादेन यांची भेट घेतली. त्या बैठकीत दहा लाख पौंड घेण्यात आले होते.

ऑफशोअर कंपनीत पैसे लपवल्याचा आरोप

पॅराडाईज पेपर्सच्या कागदपत्रातही चार्ल्सचे नाव आले. चार्ल्सने आपले पैसे एका ऑफशोअर कंपनीत लपविल्याचे अहवालात म्हटले आहे. हवामान बदलाच्या मुद्द्यावर काम करणारी ही कंपनी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT