Vaccination  Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटनमध्ये 12 ते 15 वर्षांच्या मुलांचे लसीकरण होणार सुरु; 2 कंपन्यांच्या लसींना मंजुरी

आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले की, मंजुरी मिळताच लसीकरण मोहीम सुरु करण्यास तयारी सुरु होईल.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोना विषाणूच्या (Covid19) तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे आरोग्य तज्ज्ञ मुलांना लवकरात लवकर लसीकरण करण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, यूके सरकारने (UK Government) सांगितले की ते 12-15 वर्षे वयाच्या मुलांना लसीकरण करण्याची तयारीही सुरु केली आहे. मात्र, देशातील आरोग्य सल्लागार समितीने या लसीकरण मोहिमेला अद्याप मान्यता दिलेली नाही.

आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले की, मंजुरी मिळताच लसीकरण मोहीम सुरु करण्यास तयारी सुरु होईल. देशाच्या बहुतांश भागांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने शाळांमध्ये कोरोना लस देण्यास तयार असल्याचे देखील आरोग्य विभागाने यावेळी म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये येथे शाळा उघडल्या जातील. ब्रिटनमध्ये आधीच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या, 16 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना लसीकरण केले जात आहे.

मुलांसाठी दोन लसींना मंजूर

ब्रिटनच्या औषध नियामकाने 12-15 वयोगटातील मुलांसाठी फायझर आणि मॉडर्ना लसींना मंजुरी दिली आहे, परंतु लसीकरणाबाबत धोरण ठरवणाऱ्या संयुक्त समितीने अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. अमेरिका, कॅनडा आणि अनेक युरोपियन देशांमध्ये, किमान 12 वर्षांच्या मुलांचे लसीकरण करण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

Talpan: तळपणची समुद्री गस्तीबोट नादुरुस्त, किनारी सुरक्षा पोलिसांची व्यथा; नवीन बोटीची मागणी

SCROLL FOR NEXT