संयुक्त राष्ट्र संघाच्या COP26 पर्यावरण परिषदेला राणी एलिझाबेथ II राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह सुमारे 120 राष्ट्रप्रमुख त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
Britain Queen Elizabeth II
Britain Queen Elizabeth IIDainik Gomantak
Published on
Updated on

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ- II नोव्हेंबरमध्ये स्कॉटलंडमधील (Scotland) ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत सहभागी होणार आहेत. शिखर परिषदेच्या आयोजकांनी शनिवारी याची पुष्टी केली आहे. क्वीन एलिझाबेथ (95) शिखर परिषदेत जागतिक नेत्यांसह सहभागी होतील. ही परिषद गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच होणार होती परंतु कोविड -19 च्या साथीमुळे (Covid-19 Pandemic) ती पुढे ढकलण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह सुमारे 120 राष्ट्रप्रमुख त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

पोप फ्रान्सिस आणि पर्यावरण हक्क कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग, इतरांसह, या कार्यक्रमासाठी 1 ते 12 नोव्हेंबर दरम्यान स्कॉटलंडमध्ये येण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे कॅबिनेट मंत्री आणि कॉप 26 शिखर परिषदेचे (Climate Summit) अध्यक्ष आलोक शर्मा यांनी ट्विट करत म्हटले की, "या वर्षी ब्रिटनची राणी देखील कॉप 26 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत." भारत दौऱ्यावरुन परतले. तसेच दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेची माहिती ट्विट करुन दिली होती.

Britain Queen Elizabeth II
YouTubeने हटवले जवळपास 10 लाख व्हिडिओ, काय आहे नेमके कारण

भारताबद्दल काय म्हटले होते?

शर्मा म्हणाले, “गेल्या आठवड्यात माझ्या भेटीदरम्यान, 2030 पर्यंत 450 GW च्या लक्ष्याकडे अक्षय ऊर्जेवर भारताच्या प्रगतीबद्दल ऐकून मी प्रभावित झालो. अशी आशा आहे की, भारत सीओपी 26 पूर्वी कोणत्याही प्रगत एनडीसी (राष्ट्रीय पातळीवर निर्धारित योगदान) मध्ये अशा महत्वाकांक्षी धोरणात्मक वचनबद्धता समाविष्ट करण्यावर विचार करेल. या संदर्भात, त्वरित पाऊले उचलण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.

Britain Queen Elizabeth II
चीनच्या मनात नेमके आहे तरी काय? ड्रॅगनकडून क्षेपणास्त्रांची तैनाती सुरूच   

जगातील प्रत्येक प्रदेश प्रभावित होईल

हवामान बदलासंबधी जलद पावले न उचलल्यास जगाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. तीव्र उष्णता, मुसळधार पाऊस, दुष्काळ, आर्क्टिकमध्ये बर्फ वितळण्याची भीती होती. अहवालात कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देताना असे म्हटले होते की, जर तापमानातील वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित असेल तर हवामान बदलाचे (Climate Change Effects) टोकाचे परिणाम टाळण्यास मदत होईल. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जगाला 'कॉप २' 'मध्ये आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे, 'आताच जागे होण्याची संधी 'असे वर्णन जगाला आव्हान केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com