Luiz Inacio Lula da Silva Dainik Gomantak
ग्लोबल

Brazil: ब्राझीलमध्ये मोठी उलथापालथ, राष्ट्रपतींनी 13 लष्करी अधिकाऱ्यांची केली हकालपट्टी

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा (Luiz Inacio Lula da Silva) यांनी बुधवारी आणखी 13 लष्करी अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.

दैनिक गोमन्तक

Brazil Political Crisis: ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा (Luiz Inacio Lula da Silva) यांनी बुधवारी आणखी 13 लष्करी अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. फ्रान्स 24 च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. (Brazil Political Crisis)

या अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या कार्यालयात नेमण्यात आले होते. अधिकृत राजपत्रातील नोटीसमध्ये म्हटले आहे की, अध्यक्षपदाशी संलग्न संस्थात्मक सुरक्षा कार्यालयातून 13 सैनिकांना बडतर्फ करण्यात आले आहे.

दरम्यान, अल्व्होराडा अध्यक्षीय निवासस्थानातून मंगळवारी 40 लष्करी अधिकाऱ्यांना हटवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 8 जानेवारी रोजी सरकारी इमारतींवर हल्ला करणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल लुला यांनी लष्करावर अविश्वास व्यक्त केला होता.

'लुला म्हणाले, दंगलखोरांना आतून मदत मिळत आहे'

माजी अध्यक्ष बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी अध्यक्षीय राजवाडा, सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि काँग्रेसवर हल्ला केल्याच्या काही दिवसांनंतर, लुला म्हणाले की, दंगलखोरांना अंतर्गत मदत होती आणि संपूर्ण दंगलीत सुरक्षा दलांच्या सहभागाकडे लक्ष वेधले.'

आंदोलक बोल्सोनारो यांच्या पराभवाचा निषेध करत होते

आंदोलक ऑक्टोबरच्या निवडणुकीत बोल्सोनारोंच्या पराभवाचा निषेध करत होते. तर लुला यांची हकालपट्टी करण्यासाठी आणि लोकप्रिय नेत्याची पुनर्स्थापना करण्यासाठी लष्करी बंडाची हाक देत होते.

डाव्या विचारसरणीच्या लुला, 77, यांनी ऑक्टोबरच्या निवडणुकीत (Election) बोल्सोनारो यांचा थोडक्यात पराभव केला. सुमारे 1,400 कथित दंगलखोर 8 जानेवारीच्या उठावाच्या मास्टरमाईंड आणि फायनान्सर्सचा शोध घेत असताना अटकेत आहेत. आतापर्यंत 39 जणांवर अधिकृतरित्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT