Brazil Jesus Statue: ब्राझीलमधून एक अद्भुत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री येथील प्रसिद्ध येशूच्या पुतळ्यावर वीज कोसळली आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
खरंच हा फोटो अद्भुत आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता की येशूच्या डोक्याच्या अगदी मध्यभागी वीज पडतांना दिसत आहे. समुद्रसपाटीपासून 700 मीटरपेक्षा जास्त उंचीवर डोंगराच्या शिखरावर येशूची ही मूर्ती आहे.
ब्राझिलियन (Brazil) न्यूज पोर्टल UOL ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्चच्या डेटाच्या आधारे सांगितले आहे की, येशूच्या मूर्तीवर वर्षातून सरासरी 6 वेळा वीज पडते. 2014 मध्ये वीज पडली तेव्हा मूर्तीची दुरुस्ती करावी लागली होती. त्यानंतर दुसऱ्या एका घटनेत मूर्तीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचे टोक विजेच्या धक्क्याने तुटले.
पुतळ्यावर वीज पडण्याचा तो क्षण खरोखरच अद्भुत होता. ब्राझीलमधील एन्कांटॅडो येथे येशूची ही जगातील तिसरा सर्वात उंच पुतळा आहे. त्याचे बांधकाम एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झाले. त्याची उंची सुमारे 141 फूट एवढी आहे.
या पुतळ्याचे आणखी एक खास गोष्ट आहे. यामध्ये हृदयाच्या आकाराची बाल्कनी देखील आहे. जी जमिनीपासून 40 मीटर उंचीवर येशूच्या छातीवर आहे. पर्यटक लिफ्टच्या साहाय्याने या बाल्कनीत पोहचु शकतात. तेथून त्यांना देशाचे अद्भुत दृश्य पाहण्याचा अनुभव घेता येतो. या पुतळ्याला 'ख्रिस्ट द प्रोटेक्टर' असे नाव देण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.