America Dainik Gomantak
ग्लोबल

America: धक्कादायक! दोन वर्षांच्या मुलाला दिले मगरीच्या तोंडी? बायकोची चाकू भोकसून हत्या

अमेरीकेच्या फ्लोरिडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pramod Yadav

अमेरीकेच्या फ्लोरिडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या फ्लोरिडातील एका 2 वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी चक्क मगरीच्या तोंडात सापडला. तर त्याची आई, पशून जेफरी यांची चाकू भोकसून केली हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

टेलेन मॉस्ले असे बेपत्ता झालेल्या व त्यानंतर मृत सापडलेल्या दोन वर्षीय मुलाचे नाव आहे.

सेंट पीटर्सबर्ग पोलिस विभागाच्या फेसबुक पेजनुसार, मुलाचे वडील थॉमस मोस्ले यांच्यावर सुश्री जेफरी आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी हत्येचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

"मुलाची आई, पशून जेफरी, गुरुवारी दुपारी, 30 मार्च रोजी बेपत्ता होती. दरम्यान, दुपारी तिच्या सेंट पीटर्सबर्ग अपार्टमेंटमध्ये चाकूने वार केलेल्या अवस्थेत आढळली. विभागाच्या सर्व संसाधनांचा वापर करून मोठी शोध मोहिम करण्यात आली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह सापडले." असे विभागाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

डेल होम्स पार्कमध्ये, जेफरी मृत अवस्थेत आढळल्या तर, अपार्टमेंटपासून थोड्या अंतरावर, मगर आणि तिच्या तोंडात काहीतरी असल्याचे पोलिसांना दिसले. दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर मुलाचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. पोलिसांना दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह पूर्णपणे मगरीच्या तोंडात सापडला. "आम्हाला कल्पना देखील नव्हती मात्र मृतदेह मगरीच्या तोंडात सापडला असे पोलिसांनी म्हटले आहे.

अशा प्रकारची घटना अतिशय दुर्मिळ असून, एखाद्या कुटुंबाचा अशा पद्धतीने शेवट होणे दुर्दैवी आहे. असेही पोलिस म्हणाले.

थॉमस मोस्ले यांना पिनेलास काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांशी बोलायचे नाही या कारणास्तव त्याने कायदेशीर सल्ल्याची विनंती केली. या घटनेबाबत अधिक माहिती तपासानंतर समोर येईल असे पोलिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT