Twitter Legacy Blue Tick Removal: ट्विटरवरील ब्लू टिक युजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरील व्हेरिफाईड ब्लू टिकधारकांच्या अकाऊंटवरून कधीपासून ब्लू टिक्स काढल्या जातील, याची तारीख घोषित केली आहे.
मस्क यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे की, 20 एप्रिलला ट्विटरवरील लेगेसी ब्लू टिक मार्क म्हणजेच व्हेरिफाईड अकाउंट्समधून ब्लू टिक काढून टाकण्यात येईल.
20 एप्रिलपासून, ब्लू टिक चेकमार्क असलेल्या वापरकर्त्यांच्या खात्यातून ब्लू टिक काढून टाकला जाईल आणि फक्त तेच वापरकर्ते जे ट्विटर ब्लूचे सदस्य आहेत त्यांच्या अकाऊंटवर ब्ल्यू टिकमार्क दिसेल.
तुम्हाला तुमच्या ट्विटर अकाऊंटसाठी ब्लू टिक टिकवून ठेवायचे असेल, तर ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
2009 मध्ये, ट्विटरने ब्लू टिक मार्क देण्यास सुरुवात केली आणि याद्वारे सेलिब्रिटींच्या अधिकृत अकाऊंटना ब्लू टिक दिली गेली. मस्क ट्विटरचे मालक बनताच त्यांनी ट्विटरच्या या सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली होती.
अलीकडेच मस्कने ट्विटरच्या लोगोचा आयकॉनिक ब्लू बर्ड काढून त्याजागी कुत्र्याचा लोगो लावला होता आणि त्याच्या या हालचालीने वापरकर्ते आश्चर्यचकित झाले होते. ट्विटरचे मालक झाल्यापासून मस्क हे ट्विटरबाबत सतत नवनवीन निर्णय घेत आहेत.
ट्विटरचे मालक बनताच त्यांनी ब्लू टिक वापरकर्त्यांसाठी पेमेंट आकारण्याची प्रणाली जाहीर केली.
तेव्हापासून ट्विटरच्या लीगसी ब्ल्यू टिक वापरकर्त्यांच्या खात्यांमधून ब्लू टिक्स कधी हटवल्या जातील याबद्दल अटकळ बांधली जात होती. आता मस्क यांनी त्याची तारीख जाहीर केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.