Blind Man Dainik Gomantak
ग्लोबल

अजबच! महिलेचा अंध व्यक्तीवर टक लावून पाहिल्याचा आरोप, 'हे' विचित्र प्रकरण वाचून तुम्हीही म्हणाल...

Manish Jadhav

महिलांसोबत असभ्य वर्तन आणि विनयभंगाच्या घटना अनेकदा समोर येतात. यातील अनेक घटना खऱ्या ठरतात, तर कधी खोट्याही ठरतात. महिला पुरुषांवर खोटे आरोप करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताना अनेक वेळा असे प्रकारही पाहायला मिळतात. जरी असे आरोप सामान्यतः डोळे असलेल्या लोकांवर म्हणजे ज्यांना दिसत आहेत त्यांच्यावर लावले जात असले तरी आजकाल असे एक विचित्र प्रकरण चर्चेत आहे, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एका महिलेने एका व्यक्तीवर आरोप केला आहे, ज्याला डोळे नाहीत. म्हणजेच तो जग पाहू शकत नाही.

दरम्यान, टॉबी एडिसन असे या व्यक्तीचे नाव असून तो 21 वर्षांचा असून तो यूकेचा रहिवासी आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, टॉबीसोबत घडलेली घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी तो व्यायामासाठी जिममध्ये जात असे. त्याने सांगितले की, एके दिवशी तो त्याच जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक एक महिला त्याच्याजवळ आली आणि त्याला विचारले की, तू माझ्याकडे का बघत आहेस? त्यावर टॉबीने तिला सांगितले की, तो अंध आहे, त्याला काहीही दिसत नाही, परंतु महिलेने त्याचे ऐकले नाही. टॉबी खोटे बोलत आहे असे तिला वाटले.

अशा स्थितीत महिलेने तात्काळ जिमच्या मॅनेजरला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. यावर जिमच्या मॅनेजरने टॉबीकडे विचारपूस केली, तेव्हा टॉबीने त्यालाही आपण अंध असल्याचे सांगितले, त्याला काहीच दिसत नाही. पण त्या महिलेप्रमाणे त्याचाही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे त्याने टॉबीला जिममधून बाहेर काढले. टॉबीने सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेल्या या विचित्र घटनेबद्दल सांगितले आणि काही लोकांमुळे महिलांना जिममध्येही असुरक्षित वाटत असल्याची चिंता व्यक्त केली.

रिपोर्ट्सनुसार, टॉबी हा विद्यार्थी असून तो मानसशास्त्र आणि समुपदेशनाचा अभ्यास करत आहे. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी पोस्ट करत असतो. या व्हिडिओंमध्ये तो अनेकदा काठी घेऊन जाताना दिसतो, कारण प्रत्यक्षात त्याला काहीच दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT