Ankara Parliament Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey Blast: तुर्कीच्या संसदेजवळ आत्मघातकी हल्ला, हल्लेखोराने स्वतःला उडवले; दुसरा गोळीबारात ठार!

Ankara Parliament Blast: तुर्कीची राजधानी अंकारा येथे संसदेजवळ भीषण स्फोट झाला आहे.

Manish Jadhav

Ankara Parliament Blast: तुर्कीची राजधानी अंकारा येथे संसदेजवळ भीषण स्फोट झाला आहे. यादरम्यान गोळीबार झाल्याचीही बातमी आहे. या घटनेत किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मात्र या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा आणि तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. राजधानी अंकारामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, तुर्की सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. तुर्कीच्या संसदेच्या अगदी जवळ हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटासोबत गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने अंकारामध्ये खळबळ उडाली आहे.

एएफपी वृत्तसंस्थेनुसार, अध्यक्ष एर्दोगान यांच्या सरकारने याला "दहशतवादी हल्ला" म्हटले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सांगितले की, रविवारी त्यांच्या मंत्रालयाजवळ आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत हल्लेखोराने स्फोट केला, तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या (Police) चकमकीत मारला गेला.

या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे येरलिकाया यांनी सांगितले. तुर्कीमध्ये उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर रविवारी संसदेचे कामकाज पुन्हा सुरु होणार होते. कामकाज सुरु होण्याच्या काही तास आधीच हा आत्मघाती हल्ला झाला.

दरम्यान, या स्फोटात किती नागरिक जखमी झाले आहेत आणि किती जणांचा मृत्यू झाला आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. यापूर्वी, तुर्की मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये गृह मंत्रालयाजवळील रस्त्यावर चिखल दिसत होता.

तपास सुरु केला

तुर्कीच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळावरुन विविध संशयास्पद बॅग आणि पॅकेजेस हटवण्यात येत होते तेव्हा दोन जोरदार स्फोट झाले. दरम्यान, या हल्ल्याची चौकशी सुरु केली आहे, असे तुर्कीचे कायदामंत्री यिलमाझ तुन्च यांनी सांगितले.

असे हल्ले दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अडथळा ठरणार नाहीत, असेही ते म्हणाले. दहशतवादाविरुद्ध (Terrorism) आमची लढाई सुरुच राहील. याबाबत कोणीही शंका घेऊ नये, असेही ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

Goa politics: 'NDZ'ला विरोध कशासाठी? दिल्लीतील लॉबीने गोव्‍यात खरेदी केलेल्‍या जमिनी वाचवण्‍यासाठी धडपड? मिकी पाशेको यांचा आमदार व्हेंझींना सवाल

Goa Health Insurance: "प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स द्या", 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चर्चेसाठी मागितला वेळ

SCROLL FOR NEXT