SCO Meeting 2023 Dainik Gomantak
ग्लोबल

SCO Meet: 'पाकिस्तानला भारताची सर्वाधिक गरज', गोव्यात येण्यापूर्वी बिलावल भुट्टोंना तज्ञ व्यक्तीचा सल्ला

बिलावल गोव्यात येण्यापूर्वीच माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) कमर जावेद बाजवा यांच्याशी संबंधित माहिती समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

SCO Meeting Goa: गोव्याची राजधानी पणजी येथे 4 आणि 5 मे रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची परराष्ट्र मंत्र्यांची परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारतात येणार आहेत. 2014 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा पाकिस्तानचा एखादा उच्चपदस्थ नेता भारताला भेट देणार आहेत.

परिषदेबाबत भारतात जोरदार तयारी सुरू असतानाच पाकिस्तानमध्ये मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. बिलावल गोव्यात येण्यापूर्वीच माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) कमर जावेद बाजवा यांच्याशी संबंधित माहिती समोर आली आहे.

भारत-पाकिस्तान संबंधातील तज्ज्ञ शहजाद चौधरी यांनी एक्सप्रेस ट्रिब्यूनमध्ये एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी बाजवा नोव्हेंबर 2022 मध्ये निवृत्त झाले होते. त्याच्यावर जे काही आरोप झाले आहेत ते किती खरे आहेत हे कळत नाही. पण पाकिस्तानचे भारत धोरण आजतागायत बदललेले नाही. त्यात बदल करायचा असला तरी तो करू शकला नाही. चौधरी यांच्या मते पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या आर्थिक मंदीतून जात आहे.

देशाची राजकीय स्थिती अत्यंत बिकट आहे. तसेच, आता काश्मीर आणि भारत-पाकिस्तान हा जगासाठी अतंत्य जटील मुद्दा ठरत आहे. भारत आर्थिक आणि राजकीय पातळीवर जगात वेगाने पुढे जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमधील जनता या प्रश्नाची किंमत चुकवत आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानकडून जे काही युक्तिवाद केले जातात, ते पूर्णपणे खालच्या पातळीवरचे आहेत. असे शहजाद चौधरी यांनी म्हटले आहे.

काश्मीरमधील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादाची गरज असल्याचे शहजाद चौधरी यांचे म्हणणे आहे.

भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू होईल तेव्हाच पाकिस्तानचे सशक्त अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होईल. पाकिस्तानला प्रादेशिक आधारावर भारतासोबतचे संबंध पुनरुज्जीवित करावे लागतील. काश्मीर आणि नियंत्रण रेषेपासून वेगळे करून व्यापार सक्रिय ठेवण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान मधील प्रत्येकासाठी संसाधने उपलब्ध करून द्यायची असतील, तर संपर्क आणि संवाद वाढवण्याची नितांत गरज असल्याचे शहजाद यांनी लेखात म्हटले आहे.

आज भारताला पाकिस्तानची गरज भासणार नाही. पण पाकिस्तानला भारताची सर्वाधिक गरज आहे. धोरणात्मकदृष्ट्या, ही कदाचित एक वाईट स्थिती आहे परंतु त्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. असे मत शहजाद यांनी मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT