Israel Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Politics: PM नेतन्याहूंविरोधात इस्रायली जनता रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं प्रकरण

दैनिक गोमन्तक

Israel: इस्त्राइलमध्ये लाखो लोक नेतन्याहू सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. नेतन्याहू सरकारने न्यायप्रणालीत बदल करण्यासाठी जी योजना आखली आहे त्याचा विरोध करण्यासाठी हे सर्व लोक एकत्र आल्याची माहिती समोर येत आहे.

टाइम्स ऑफ इसराइल या इस्त्राइली मिडियानुसार,शनिवारी रात्री तेल अविवच्या रस्त्यावर लाखो लोकांनी एकत्र येत सरकारच्या या न्यायप्रणालीत बदल करण्याच्या योजनेचा मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तेल अविवशिवाय यरुशलम, हाइफा, बेर्शेबा, हर्ज़लिया समवेत संपुर्ण देशभर लोकांनी एकत्र रॅली आपला विरोध दर्शवला आहे. याआधीसुद्धा मागच्या आठवड्यात तेल अविवमध्ये 80 हजारापेक्षा लोकांनी एकत्र येत आपला विरोध दर्शवला आहे. लोकांची गर्दी इतकी होती संपुर्ण रस्ते बंद झाले होते.

गर्दी पांगण्यासाठी सरकारला मोठ्या पोलीस( Police ) फोर्सचा बंदोबस्त करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की न्याय मंत्री यारिव लेविन द्वारा आणलेल्या प्रस्तावांमुळे हायकोर्टाच्या न्यायिक समीक्षा शक्तींवर प्रभाव पडेल. त्याचबरोबर, न्यायाधीशांच्या नेमणुकीवर राजकीय प्रभाव पडेल असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. इस्रायली लेखक डेव्हिड ग्रॉसमन यांनी जमावाला संबोधित करताना म्हटले आहे की, जगात एक अशी जागा असेल जिथे ज्यू लोकांना घरासारखे वाटेल. मात्र लाखो लोकांना आपल्याच देशात परक्यासारखे वाटत आहे.याचा सरळ अर्थ आहे जरुर काहीतरी चुकीचे होत आहे.

दरम्यान, माजी संरक्षणमंत्री नेतामोशे या'लोन यांनी बेंजामिन नेत्याहूनची सरकार गुन्हेगारांची हुकुमशहा असल्याचे म्हटले आहे. मात्र आम्ही याचा विरोध करु आणि लोकशाही नेहमीच हुकुमशाहीला नमवते असेही त्यांनी म्हटले आहे. आता या मोठ्या विरोधानंतर आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर इस्त्राइल( Israel ) सरकार आपला निर्णय बदलणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT