court Dainik Gomantak
ग्लोबल

कतारमध्ये कैदेत असलेल्या 8 भारतीयांना मोठा दिलासा, फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आता काय असणार भविष्य?

Dahra Global Case in Qatar Latest Updates: कतारमधील तुरुंगात बंद असलेल्या आठ भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Manish Jadhav

Dahra Global Case in Qatar Latest Updates: कतारमधील तुरुंगात बंद असलेल्या आठ भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कतारच्या अपीलीय न्यायालयाने त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. कतारमधील दाहरा ग्लोबल प्रकरणातील निर्णयावर परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारत सरकारचे हे मोठे राजनैतिक यश मानले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून होते आणि पीडितांना कॉन्सुलर मदत करत होते.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, "दाहरा ग्लोबल प्रकरणात कतारच्या अपीलीय न्यायालयाच्या आजच्या निर्णयाची आम्ही नोंद घेतली आहे, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. सविस्तर निर्णयाची प्रतीक्षा आहे. कतारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांनी आज पीडितांची भेट घेतली. आम्ही खटल्याच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत देत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडे मांडत राहू."

दुसरीकडे, कतार न्यायालयाने ज्या आठ भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावली ते सर्वजण 'अल-जाहिरा अल-अलमी कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस' या कंपनीत काम करत होते. हे सर्व भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप होता. या आठ भारतीयांना आता फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा होणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मात्र, त्यांची किती दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा कमी झाली याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. हे सर्व माजी नौदलाचे अधिकारी गेल्या वर्षी ऑगस्टपासून कतारच्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील आरोपांबाबत कतारने अद्याप माहिती दिलेली नाही. या 8 माजी नौसैनिकांमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित कमांडर पूर्णांदू तिवारी (आर) यांचाही समावेश आहे. 2019 मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... प्रदर्शन करणाऱ्या महिलेसमोर उभा ठाकला तिचाच पोलिस पती; पाहा सुंदर व्हिडिओ

North Goa: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची खैर नाही! 66 जणांना ठोकल्या बेड्या; उत्तर गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT