अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी कॉंग्रेसला पहिला संयुक्त भाषण दिले. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात अमेरिकेने पूर्ण ताकदीने लढत आहे. अमेरिका देश पुन्हा एकदा टेक ऑफ करण्यास तयार आहे. आम्ही चालवलेला लसीकरणाचा कार्यक्रम देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी उपलब्धी आहे असे जो बायडेन म्हणाले. अमेरिका पुन्हा प्रगतीच्या मार्गाने पुढे चालला आहे. आम्ही परत जोमाने कमला लागलो आहे आणि नव्या स्वप्नांसोबत नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे बायडन म्हणाले. (Biden's 100-day tenure complete "America" ready for takeoff)
अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज
अर्थव्यवस्थेला पुन्हा पटरीवरती आणण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचेही म्हणाले आहेत. पुढे बायडन म्हणाले मला पूर्ण भरोसा आहे आम्ही नक्कीच वापसी करू. अमेरिकेच्या लोकांना त्यांनी कोरोना लस टोचून घ्यायला आवाहन केले आहे. लसींची कुठलीही कमतरता नसल्याचे बायडन यांनी सांगितले.
अमेरिकेला चीनचा सामना करायचा नाही
बायडन म्हणाले की, अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मजबूत सैन्य उपस्थिती कायम ठेवेल. हे संघर्ष सुरू करण्यासाठी नाही तर इतर देशांना असे करण्यापासून रोखण्यासाठी आहे. मी चीनचे अध्यक्ष शी चिनपिंग यांना सांगितले की अमेरिका प्रतिस्पर्ध्याचे स्वागत करतो, पण आम्हाला संघर्ष नको आहे.
सभापती नैंसी पेलोसी यांनी हे निमंत्रण दिले
अमेरिकेतील, सभागृह प्रतिनिधी नैंसी पेलोसी यांना बायडन यांना आमंत्रण पाठविले. बायडन यांनी प्रथमच कॉंग्रेसमधील संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. पैलोसी यांनी बिडेन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जेव्हा आपण सुमारे 100 दिवसांपूर्वी अध्यक्षांची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आपल्या बाजूने मदत होईल असे मोठ्या आशेने वचन दिले. आता आपल्या ऐतिहासिक आणि परिवर्तनवादी नेतृत्त्वामुळे येथे मदत आली आहे. ते म्हणाले की या भावनेतूनच मी तुम्हाला या ऐतिहासिक क्षणाची आव्हाने व संधी या विषयी आपली मते सांगण्यासाठी कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करते. त्यानंतर बायडन यांनी पेलोसीचे आमंत्रण स्वीकारले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.