Betty Bbromage  Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

Betty Bbromage 97 Year Old Wing Walker: "आयुष्यात कंटाळवाणे जगण्यापेक्षा काहीतरी रोमांचक आणि थरारक केलेले कधीही उत्तम," असे उद्गार काढत ब्रिटनमधील 97 वर्षांच्या एका आजीबाईने संपूर्ण जगाला थक्क केले.

Manish Jadhav

Betty Bbromage 97 Year Old Wing Walker: "आयुष्यात कंटाळवाणे जगण्यापेक्षा काहीतरी रोमांचक आणि थरारक केलेले कधीही उत्तम," असे उद्गार काढत ब्रिटनमधील 97 वर्षांच्या एका आजीबाईने अवघ्या जगाला थक्क केले. वाढते वय आणि आरोग्याच्या समस्यांचा विचार न करता ब्रिटनच्या बेट्टी ब्रोमेज या आजीने हवेत उडणाऱ्या विमानाच्या पंखावर उभे राहून (विंग वॉकिंग) स्वतःचाच जुना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. विशेष म्हणजे, एका अत्यंत गंभीर स्ट्रोकच्या आजारावर मात केल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आत त्यांनी हा थरारक पराक्रम करुन दाखवला.

चेल्टेनहॅम येथील रहिवासी असलेल्या बेट्टी ब्रोमेज यांनी सायरेंसस्टर येथील 'आरएफसी रेंडकॉम्ब' एअरफील्डवर हा अद्भूत कारनामा यशस्वीरित्या पूर्ण केला. जेव्हा त्यांनी हवेत उडणाऱ्या विमानाच्या पंखावर पाय ठेवून हे ऐतिहासिक उड्डाण घेतले, तेव्हा त्यांचे अचूक वय 97 वर्षे आणि 127 दिवस इतके होते. याआधी त्यांनी 2022 मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी जगातील सर्वात वृद्ध महिला विंग वॉकर होण्याचा विक्रम केला होता, जो त्यांनी आता स्वतःच मोडीत काढला. वयाच्या 87 व्या वर्षापासून साहसाची आवड जपणाऱ्या या आजीबाईने आतापर्यंत तब्बल 6 वेळा विंग वॉकिंग पूर्ण केले.

बेट्टी यांच्यासाठी हे उड्डाण केवळ रोमांच किंवा थरार अनुभवण्यासाठी नव्हते, तर त्यांना नवीन जीवन देणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते एक माध्यम होते. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांना गंभीर स्ट्रोकचा झटका आला होता, ज्यामुळे आजही त्यांना बोलताना काही अडचणी येतात. चेल्टेनहॅम जनरल हॉस्पिटलच्या स्ट्रोक युनिटने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. त्यामुळे या हॉस्टिपलला मदत निधी उभारुन देण्यासाठी आणि इतर रुग्णांवर चांगल्या दर्जाचे उपचार व्हावेत, या सामाजिक हेतूने बेट्टी यांनी ही विंग वॉक केली.

आपल्या या धाडसाबद्दल बोलताना बेट्टी म्हणाल्या की, "जर मी हे केले नाही, तर मी आयुष्याला कंटाळून जाईन. आता मी गाडी चालवू शकत नाही, माझी दृष्टी थोडी कमकुवत झाली आहे, त्यामुळे मी जे करु शकते ते पूर्ण उत्साहाने करते." वयाची शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर असतानाही बेट्टी ब्रोमेज यांनी दाखवलेल्या या अफाट धैर्यामुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT