

Pickup Van Car Accident Viral Video: सोशल मीडिया हे सध्याच्या काळात केवळ मनोरंजनाचे साधन उरलेले नसून, या प्लॅटफॉर्मवर दररोज विविध प्रकारचे अनोखे आणि धक्कादायक व्हिडिओ समोर येत असतात. कधी मजेशीर किस्से, कधी जुगाड, तर कधी नृत्याचे व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, या सगळ्यामध्ये रस्त्यांवरील थरारक आणि भीषण अपघातांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, जे पाहून युजर्सच्या अंगावर काटा येतो. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा आणि चालकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अवघ्या 18 सेकंदांचा आहे, मात्र त्यातील भीषण दृश्ये कोणालाही थक्क करतील अशीच आहेत. व्हिडिओमध्ये एक पिकअप व्हॅन मुख्य रस्ता ओलांडताना दिसत आहे. त्याचवेळी, त्या रस्त्यावरुन एक वेगवान लक्झरी कार अत्यंत वेगाने येत असलेली दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पिकअप चालकाने समोरुन येणारी कार पाहूनही आपली गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, आणि दुसरीकडे कार चालकानेही आपला वेग कमी केला नाही. परिणामी, दोन्ही वाहनांमध्ये एवढी जोरदार आणि भीषण धडक झाली की, हे दृश्य पाहून कोणीही सुन्न होईल. हा अपघात (Accident) नेमका कुठे आणि कधी घडला याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हा थरारक व्हिडिओ 'एक्स'वर '@Deadlykalesh' नावाच्या युजर अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 80 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये युजर्सना सवाल विचारण्यात आला की, 'या भीषण अपघातात नक्की कोणाची चूक आहे, टोयोटा फॉर्च्युनर चालकाची की महिंद्रा पिकअप चालकाची?' या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, 'त्या पिकअप चालकाला किमान 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे.' तर दुसऱ्या युजरने कार चालकाची बाजू घेत म्हटले की, 'यात पूर्णपणे पिकअप चालकाचीच चूक आहे, कारण कार चालकाला अचानक ब्रेक लावण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास अजिबात वेळ मिळाला नाही.' चालकांच्या एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे किती मोठा अनर्थ घडू शकतो, याचे जिवंत उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.