Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायलने पुन्हा सुरु केले हल्ले; युद्ध थांबवण्याबाबत हमासशी कोणताही करार नाही!

Israel-Hamas War: हमाससोबत सुरु असलेली युद्धबंदी संपुष्टात आली आहे. इस्रायल पुन्हा हल्ला करण्याच्या स्थितीत आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: हमाससोबत सुरु असलेली युद्धबंदी संपुष्टात आली आहे. इस्रायल पुन्हा हल्ला करण्याच्या स्थितीत आहे. गाझामध्ये पुन्हा एकदा हल्ले सुरु केले असून हमासला लक्ष्य केले जात असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. ओलिसांची सुटका करण्यासाठी सध्या सुरु असलेली युद्धबंदी वाढवण्याबाबत कोणताही करार झालेला नाही आणि त्यामुळे त्याने पुन्हा हल्ले सुरु केले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने इस्रायलकडून हल्ले होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पत्रकाराने सांगितले की, त्याने इस्रायली हवाई हल्ले आणि जमिनीवर गोळीबार पाहिला.

दरम्यान, इस्रायलने पुन्हा एकदा युद्ध सुरु करण्यासाठी हमासला जबाबदार धरले आहे. इस्रायली लष्कराने ट्विट केले की, 'हमासने युद्ध थांबवण्याच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्याने इस्रायलच्या भूमीवर हल्ला केला आहे. त्याला प्रतिसाद म्हणून आम्हीही कारवाई सुरु केली आहे. आता आम्ही गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत आहोत. दरम्यान, इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्याबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. इस्रायलला हमासच्या हल्ल्याबाबत आधीच माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

आता प्रश्न असा आहे की, जर इस्रायलकडे या हल्ल्याची माहिती आधीच होती तर त्यांनी कारवाई का केली नाही? न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ज्यू देशाला वाटत होते की हमास हल्ला करण्यास सक्षम नाही. इस्रायलच्या अधिकार्‍यांना हमासच्या हल्ल्याच्या सुमारे एक वर्ष आधी याची माहिती मिळाली होती. त्याच्यासोबत डॉक्युमेंटही शेअर केली. पण हमास प्रत्यक्षात असा भीषण हल्ला करु शकतो याची कल्पना इस्रायली लष्कर आणि यंत्रणांना नव्हती.

दरम्यान, इस्रायली लष्कराला मिळालेल्या कागदपत्रांमध्ये हल्ल्याच्या तारखेचा उल्लेख नाही. पण हमास सीमा ओलांडून हल्ला कसा करु शकतो हे निश्चितच होते. पण हमासने आश्चर्यचकित केले आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील 75 वर्षांच्या युद्धात आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT