Israel PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel America Relations: ''इस्त्रायली लष्कराच्या युनिटवर बंदी घालणे मूर्खपणाचे अन्...''; बेंजामिन नेतन्याहू बायडन सरकारवर संतापले

Israel America Relations: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

Manish Jadhav

Israel America Relations: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे अवघे जग चिंतेत आहे. यातच आता, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या वॉर कॅबिनेटने त्यांचा मित्र देश अमेरिकेवर निशाणा साधला आहे.

अलीकडेच अमेरिकेने इस्त्रायली संरक्षण दलाच्या लष्करी बटालियनवर बंदी घालणार असल्याचे सांगितले होते. 'नेत्झा येहुदा' असे या लष्करी बटालियनचे नाव आहे. मात्र, बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या वॉर कॅबिनेटच्या बहुतांश सदस्यांनी अमेरिकेचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यामुळे चुकीचा ट्रेंड सेट होईल. नेतन्याहू म्हणाले की, 'हे अत्यंत धोकादायक आहे आणि चुकीचा संदेश जाईल.' असे मानले जाते की, बायडन सरकार 'नेत्झा येहुदा' बटालियनवर कोणत्याही क्षणी बंदी घालू शकते, ज्याची घोषणा आधीच केली गेली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्त्रायली लष्कराच्या या बटालियनवर मानवाधिकार उल्लंघनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे बायडन सरकार अशाप्रकारचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. बायडन सरकार इस्रायलच्या विरोधात असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ असेल. याच कारणामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेवर (America) प्रचंड नाराज आहेत. इस्रायलच्या या लष्करी बटालियनवर मानवाधिकारांचे उल्लंघन आणि युद्ध गुन्ह्यांचे आरोप प्रदीर्घ काळापासून होत आहेत. याच बटालियनने पॅलेस्टिनी अमेरिकन व्यक्ती उमर असद यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आहे.

दरम्यान, असद यांना अतिशय थंड ठिकाणी डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. सध्या इस्रायली लष्कराची ही बटालियन गाझामध्ये तैनात आहे. या बटालियनवर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे बेंजामिन नेतान्याहू स्वतः संतापले आहेत. त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिले की, ''आयडीएफवर कोणत्याही प्रकारची बंधने लादण्यात येऊ नये. इस्रायली नागरिकांवरील निर्बंधांविरोधात मी आवाज उठवत आहे. याबाबत मी अमेरिकन सरकारशी बोललो आहे. जेव्हा आमचे सैनिक दहशतवादाचा (Terrorism) मुकाबला करत आहे, अशावेळी आयडीएफ युनिटवर बंदी घालणे मूर्खपणाचे आणि नैतिकदृष्ट्या योग्य असणार आहे."

दुसरीकडे, वॉर कॅबिनेटमधील मंत्री बेनी गँट्झ यांनीही अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ''ही बटालियन इस्रायली सैन्याचा महत्त्वाचा भाग आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणार आहोत. आपली न्यायालये स्वतंत्र आणि सक्षम आहेत. काही समस्या असतील तर आम्ही स्वतःहा सोडवू.'' ते पुढे म्हणाले की, ''आम्ही आमच्या अमेरिकन मित्रांचा आदर करतो, परंतु IDF युनिटवर निर्बंध लादणे धोकादायक ठरेल. असे केल्याने चुकीचा संदेश जाईल.'' इस्रायलचे आणखी एक मंत्री इटामन बेन ग्विर म्हणाले की, 'सैनिकांवर निर्बंध लादल्यास चुकीचा संदेश जाईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT