Ukrainian Girls  Dainik Gomantak
ग्लोबल

रशियन सैन्यांन युक्रेन तरुणींच सौंदर्यचं केलं गायब, नेमकं झालं तरी काय?

'महिलांचा कोणताही देश नसतो.' बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांच्या पुस्तकाचे हे शीर्षक आहे.

दैनिक गोमन्तक

'महिलांचा कोणताही देश नसतो.' बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांच्या पुस्तकाचे हे शीर्षक आहे. परंतु हे शिर्षक युक्रेनियन महिलांच्या बाबतीत अगदी तंतोतत असल्याचे सध्या दिसून येत आहे. युक्रेनमध्ये रशियन सैनिकांनी केलेला नरसंहार आणि क्रूरता जग पाहत आहे. युक्रेनमधून (Ukraine) दररोज क्रूरतेची नवी कहाणी समोर येत आहे. कीवपासून 50 मैलांवर इव्हान्कीव्ह हे छोटेसे गाव आहे. जे रशियन सैन्याने आता ताब्यात घेतले होते. नियंत्रणादरम्यान रशियन सैनिकांनी तिथे दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केला. 15 आणि 16 वर्षांच्या बहिणींवर बलात्कार झाल्याची तक्रार उपमहापौर मेरीना बेसचस्टना यांनी केली आहे. (Beautiful Ukrainian girls are getting ugly to escape from Russian soldiers)

रशियन सैनिकांनी मुलींवर अत्याचार करण्यासाठी केस ओढले

या छोट्या गावातल्या मुलींवर रशियन सैनिकांनी कमालीचे क्रौर्य दाखवले आहे. जीव वाचवण्यासाठी तळघरात लपलेल्या मुलींना केस ओढून बाहेर काढले आणि नंतर त्यांच्यावर अत्याचार केले. याचा परिणाम असा झाला की, आता तिथल्या मुली कुरूप दिसण्यासाठी केस लहान करु लागल्या आहेत. ते आकर्षक दिसत नसतील तर रशियन सैनिकांच्या क्रूरतेपासून वाचतील असे त्यांना वाटते.

बलात्कार करुन महिला आणि मुलींच्या अंगावर नाझीचे निशाण उमटवलं जातयं

युक्रेनच्या खासदार लिजिया वासिलेंक यांनी रशियन सैनिकांना गोत्यात उभे केले आहे. अनेक ट्विटमध्ये त्यांनी रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांवर कसे अत्याचार करतात हे सांगितले आहे. रशियन सैनिक केवळ महिलांनाच टार्गेट करत नाहीत तर त्यांनी 10 वर्षांच्या मुलींवरही बलात्कार करत आहेत. बलात्कार केल्यानंतर ते मुली आणि महिलांना फाशी देत आहेत. यासोबतच त्यांच्या शरीरावर हिटलच्या नाझी पक्षाच्या निशाणाच्या खुणाही करण्यात येत आहेत.

बलात्कारानंतर क्रूरतेपासून वाचण्यासाठी महिला आत्महत्या करतायेत

खासदाराने ट्विट करुन दावा केला आहे की, सैनिक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर बलात्कार करत आहेत. बलात्कारानंतर त्यांचा छळही ते करत आहेत. या हिंसाचारापासून वाचण्यासाठी अनेक युक्रेनियन महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचबरोबर काही जण इतके अशक्त झाले होते की, बलात्कारानंतर त्या जगूही शकल्या नाहीत. या ट्विटनंतर युक्रेनच्या नागरिकांची जाणूनबुजून हत्या केल्याच्या पुराव्यानंतर रशियावर सर्वत्र टीका होत आहे.

बुचामधील नागरिकांवर रशियन सैनिकांची क्रूरता

रशिया (Russia) -युक्रेन युद्धात आता रशियन सैन्य अनेक भागांतून माघार घेत आहे. राजधानी कीवमधून माघार घेत असताना, रशियन सैन्याने जवळच्या बुचा शहरात नागरिकांवर अत्याचार केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कीव (Kyiv) आणि त्याच्या आसपासच्या भागात 410 युक्रेनियन नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. याची पुष्टी कीवच्या सरकारी वकील इरिना वेनेडिकोटवा यांनी केली आहे. या युद्धात आतापर्यंत युक्रेनमधील 1,417 लोकांचा मृत्यू झाला असून 2,038 लोक जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT