Dubai Iraqi airline Bear Dainik Gomantak
ग्लोबल

Dubai Airport: अन् विमान उड्डाण होण्यापूर्वी कार्गोतून बाहेर आले अस्वल, दुबई विमानतळावरील घटनेने प्रवाशांची धावपळ

विमानाच्या उड्डाणाला एक तास उशीर झाला आणि प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Dubai Airport: दुबईहून इराकला जाणारे विमान उड्डाण करण्यापूर्वी त्यातून चक्क एक ग्रिझली अस्वल बाहेर आले. कार्गोमधून अचानक हे अस्वल बाहेर आले, त्यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

तसेच, विमानाच्या उड्डाणाला एक तास उशीर झाला आणि प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व गोंधळानंतर अखेर विमानाच्या कॅप्टनलाच प्रवाशांची माफी मागावी लागली.

इराकच्या पंतप्रधानांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, इराकच्या विमान कंपनीने या प्रकरणात आपला कोणताही दोष नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, अस्वलाला ताब्यात घेऊन शांत करण्यासाठी दुबईच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले होते. असे असूनही विमानाच्या कार्गोतून अस्वल कसे बाहेर पडले याची माहीती अद्याप समोर आलेली नाही.

इराक एअरवेजने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हे अस्वल दुबईहून बगदादला नेले जात होते. अस्वलाची वाहतूक करण्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सर्व मानकांचे पालन केल्याचे एअरलाइनचे म्हणणे आहे.

अस्वल विमानातून बाहेर पडल्यावर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये काही लोक अस्वलाला पुन्हा कार्गेोमध्ये टाकताना दिसत आहेत. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

दुबई हे जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पण, घडलेल्या प्रकाराबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास प्राधिकरणाने नकार दिला आहे. इराकमध्ये श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांमध्ये अस्वल पाळण्याचा ट्रेंड सातत्याने वाढत आहे.

बगदादच्या पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकरणांची तक्रार करून प्राण्यांना शहरातील रस्त्यावर मुक्तपणे फिरण्यापासून रोखण्यास मदत करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

SCROLL FOR NEXT