Vaibhav Taneja Tesla's New CFO
Vaibhav Taneja Tesla's New CFO

Tesla's New CFO: मस्कच्या टेस्लामध्ये 'वैभव', कंपनीच्या तिजोरीच्या चाव्या भारतीय व्यक्तीच्या हातात

प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांच्या अमेरिकास्थित ऑटोमोबाईल कंपनी टेस्लाने भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे.

Vaibhav Taneja Tesla's New CFO: प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांच्या अमेरिकास्थित ऑटोमोबाईल कंपनी टेस्लाने भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे.

वैभव तनेजा सध्या मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे सीएफओ पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली जाईल. मागील 13 वर्षांपासून सीएफओपदी असणाऱ्या जॅचरी किरखॉर्नची यांच्या जागी तनेजा कार्यभार संभाळतील.

टेस्लाने अचानक केलेल्या बदलाचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मागील 13 वर्षापासून कंपनीचा भाग असून, हा एक विशेष अनुभव आहे. सर्वांनी एकत्र केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे. असे किरखॉर्न यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे.

वैभव तनेजा (वय 45) हे दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आहेत. 2016 मध्ये कंपनीने सोलारसिटीचे अधिग्रहण केल्यानंतर तनेजा टेस्लाच्या टीमचा एक भाग झाले. मुख्य लेखा अधिकारी म्हणून त्याच्या प्राथमिक जबाबदारीसोबतच त्यांनी "मास्टर ऑफ कॉईन" ची महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारली.

Vaibhav Taneja Tesla's New CFO
मास्क घातला नाही म्हणून भारतीय महिलेच्या छातीवर मारली लाथ, चिनी नागरिकाला नऊ महिन्यांनंतर तुरूंगवासाची शिक्षा

जानेवारी 2021 मध्ये, वैभव तनेजा यांची टेस्लाच्या, टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडसाठी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, वैभव यांना अकाउंटिंगचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. तंत्रज्ञान, वित्त, रिटेल आणि दूरसंचार क्षेत्रात त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम केले आहे.

तनेजा यांची नियुक्ती अनेक अर्थांनी महत्वाची आहे. विशेषत: जेव्हा कंपनी त्यांच्या विक्रीला चालना देण्याचे आणि बाजारपेठेत मोठी संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

विशेष म्हणजे, मावळते सीएफओ जॅचरी किरखॉर्न एलन मस्क यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. इलॉन मस्क टेस्लासह, SpaceX, Neuralink आणि बोरिंग कंपनीचे प्रमुख आहेत. ते X चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणूनही काम करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com