Former US President Barack Obama
Former US President Barack Obama Dainik Gomantak
ग्लोबल

Barack Obama: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हनुमान 'भक्त', नेहमी त्यांच्यासोबत...!

Manish Jadhav

Barack Obama, Hanuman Jayanti 2023: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कोण ओळखत नाही. ते अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेने अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य केली.

9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला ओसामा बिन लादेनही ओबामा यांच्या अध्यक्षतेदरम्यान मारला गेला.

दरम्यान, ओबामा यांची लोकप्रियता केवळ अमेरिकाच नाही तर जगभरात कोणापासूनही लपलेली नाही, पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हनुमानाचे 'भक्त' आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? खरे तर, एका मुलाखतीत ओबामा यांनी स्वतः सांगितले होते की, ते नेहमी हनुमानाची छोटी मूर्ती सोबत ठेवतात.

दरम्यान, हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही ओबामांच्या त्या मुलाखतीबद्दल बोलत आहोत, ज्यात त्यांनी हनुमानाची मूर्ती दाखवली होती.

2016 मध्ये यूट्यूब क्रिएटर निल्सनला दिलेल्या मुलाखतीत, त्यांना अशा गोष्टींबद्दल विचारण्यात आले होते, जे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि ते नेहमी आपल्या खिशात ठेवतात.

यावर ओबामा यांनी एकामागून एक अनेक वस्तू खिशातून काढल्या आणि सांगितले की, 'जेव्हाही मला थकवा जाणवतो किंवा निराश होतो तेव्हा मी त्यांच्याकडून प्रेरणा घेतो.'

'हनुमानाची छोटी मूर्ती सोबत ठेवतात'

अमेरिकेच्या (America) माजी राष्ट्राध्यक्षांनी खिशातून काढलेल्या वस्तूंमध्ये हनुमानाची मूर्तीही होती. ही छोटी मूर्ती काढताना बराक ओबामा म्हणाले होते की, ही हिंदू देवाची मूर्ती आहे आणि एका महिलेने मला ही मूर्ती दिली होती.

याशिवाय, ओबामा यांनी त्यांना भिक्षूने दिलेली बुद्ध मूर्ती, पोप फ्रान्सिसकडून मिळालेली जपमाळ देखील दाखवली. बराक ओबामा यांचे वडील केनियाचे तर आई कंसासची महिला होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही सुरुवातीची वर्षे इंडोनेशियामध्ये (Indonesia) घालवली, जिथे हिंदू धर्म लोकप्रिय धर्म आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT