actress Charlotte Angie dainik gomantak
ग्लोबल

पोर्न चित्रपट अभिनेत्रीच्या हत्या करून मृतदेहाचे तुकडे, खुनाचे गूढ उघड

बेपत्ता असलेल्या अॅडल्ट फिल्म्सच्या स्टारची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या

दैनिक गोमन्तक

इटली : गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पोर्न चित्रपट अभिनेत्रीच्या हत्येचे गुढ उकलेले असून तिच्या मृतदेहाचे तुकडे ग्रामीण रस्त्यावर कचऱ्याच्या पोत्यात सापडले आहेत. तिच्याच प्रियकराने तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले असून पोलिसांनी 43 वर्षीय व्यावसायिक बँकर आणि फूड ब्लॉगर डेव्हिड फाँटानाला अटक केली आहे. त्याला हत्या आणि मृतदेह नष्ट करण्याच्या आणि लपविण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. (Banker arrested after the thawing body of an Italian adult actress)

बेपत्ता असलेल्या अॅडल्ट फिल्म्सच्या अभिनेत्रीचे (actress) नाव शार्लोट अँजी असून ती २६ वर्षीय होती. तिला आधी हातोड्याने मारहाण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर पोलिसांनी (Police) केलेल्या अधिक तपासात डेव्हिडने जानेवारीमध्ये अँजीची हत्या केल्याचे कबूल केल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने तिचा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवला आणि एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले त्यानंतर त्या तुकड्यांना आग लावली. तसेच काही कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये बंद करून ते ग्रामीण रस्त्यावरत कचऱ्याच्या टाकून दिल्याचे त्याने सांगितले.

शार्लोट अँजी ही मिलान, लोम्बार्डी येथील मेट्रोपॉलिटन सिटीमधील रेस्काल्डिना येथे राहत होती. तिने यापूर्वी परफ्युमरीमध्ये सेल्सवुमन म्हणून काम केले होते. परंतू कोरोनामुळे तिचे काम गेले आणि तिला आपला व्यवसाय बदलावा लागला होता. त्यानंतर ती पोर्नोग्राफीच्या (pornography) जगात आली.

दरम्यान अँजीला 11-13 मार्च दरम्यान लक्झी क्लब मिलानो येथे लक्झी इरोटिक फेस्टिव्हल 2 मध्ये सहभाग घ्यायचा होता. परंतु ती दिसली नाही. त्याच्या एका चाहत्याला त्याच्या अनुपस्थितीबद्दल संशय आला आणि त्याने याबाबत पोलिसांना सांगितले. तर याची माहिती मीडियाला दिली. त्यानंतर तपासाअंती एका चाहत्याने तिच्या टॅटूवरून तिची ओळख पठवली

मृतदेहाचे तुकडे करून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले

अभिनेत्रीच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते. बर्‍याच अडचणींनंतर, अभिनेत्रीच्या एका चाहत्याने तिच्या शरीरावर बनवलेल्या टॅटूवरून (tattoo) तिला ओळखले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT