Muhammad Yunus Dainik Gomantak
ग्लोबल

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

Greater Bangladesh Map Controversy: बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

Manish Jadhav

Greater Bangladesh Map Controversy: बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाणा प्रकार केला, ज्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला आहे.

नुकतेच पाकिस्तानचे (Pakistan) वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल साहिर शमशाद मिर्झा बांगलादेशच्या दौऱ्यावर आले होते. या भेटीदरम्यान मुहम्मद युनुस यांनी मिर्झा यांना 'आर्ट ऑफ ट्रायम्फ' (Art of Triumph) नावाचे एक पुस्तक भेट दिले. मात्र, या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील नकाशावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादग्रस्त नकाशात भारताच्या ईशान्येकडील आसामपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतच्या राज्यांचा भूभाग बांगलादेशचा भाग म्हणून दर्शवण्यात आला आहे.

युनुस यांची कृती आणि 'ग्रेटर बांगलादेश'चा वाद

मुहम्मद युनुस यांनी पाकिस्तानी जनरलला भेट दिलेल्या पुस्तकातील हा नकाशा कथितरित्या 'ग्रेटर बांगलादेश' (Greater Bangladesh) या संकल्पनेला प्रोत्साहन देणाऱ्या इस्लामिक दहशतवादी गटांच्या मागण्यांशी मिळताजुळता आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास, बांगलादेशने 1971 च्या मुक्तिसंग्रामानंतर पाकिस्तानपासून स्वतःला वेगळे केले आणि दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण राहिले. मात्र, आता बांगलादेशची कमान युनुस यांच्या हातात आल्यानंतर ढाका आणि पाकिस्तानचे जुळणारे विचित्र संबंध दिसून येत आहेत.

युनुस यांनी यापूर्वीही केले वादग्रस्त विधान

भारताच्या (India) ईशान्येकडील राज्यांबद्दल युनुस यांनी पहिल्यांदाच अशी 'नापाक' कृती केलेली नाही. यापूर्वी, एप्रिल 2025 मध्ये त्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते.

युनुस म्हणाले होते की, "भारताची सात ईशान्येकडील राज्ये भूभागाने वेढलेली आहेत आणि बांगलादेश हाच त्यांचा सागरी मार्ग आहे." एवढेच नव्हे तर, युनुस यांनी असेही म्हटले होते की, "हे चीनच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी एक संधी ठरु शकते." युनुस यांच्या या वक्तव्यावर भारताने त्यावेळी तीव्र आक्षेप नोंदवला होता.

बांगलादेशच्या इतर वादग्रस्त कृती

युनुस यांच्या वादग्रस्त विधानानंतर भारताने बांगलादेशी ट्रान्झिट करार रद्द केला होता. या करारामुळे बांगलादेशी माल भारतामार्गे नेपाळ, भूतान आणि म्यानमारपर्यंत पाठवला जात होता.

याव्यतिरिक्त, युनुस यांच्या जवळच्या एका माजी अधिकाऱ्याने तर, "भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास बांगलादेशने चीनसोबत मिळून भारताच्या ईशान्येकडील भूभागावर कब्जा केला पाहिजे," असे गंभीर विधान केले होते. तर युनुस यांच्या दुसऱ्या एका सहकाऱ्याने 'ग्रेटर बांगलादेशाचा' नकाशा सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाममधील काही भागांचा समावेश बांगलादेशात दाखवण्यात आला होता. या घटनांमुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

SCROLL FOR NEXT