Ashutosh Masgaunde
मुहम्मद अली यांचा जन्म 17 जानेवारी 1942 रोजी झाला होता. त्याचे सुरुवातीचे नाव कॅसियस मार्सेलस क्ले जूनियर होते. आज त्यांची 82 वी जयंती आहे, यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा आढावा.
अली यांनी वयाच्या 12 व्या वर्षी बॉक्सिंगचे प्रशिक्षण सुरू केले आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्याने सोनी लिस्टनला हरवून 1964 मध्ये वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली.
पहिली वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर, अली डेट्रॉईटमध्ये वॉलेस डी. फ्रेड मुहम्मद यांनी सुरू केलेल्या 'नेशन ऑफ इस्लाम'मध्ये सहभागी झाले आणि त्यांचे नाव बदलले.
व्हिएतनाम युद्धात अमेरिकेच्या सहभागामुळे त्यांच्या धार्मिक श्रद्धा दुखावल्या गेल्याचे सांगत त्यांनी सैन्यात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि हेवीवेट पदवीही काढून घेण्यात आली.
कॅसियस क्ले नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बॉक्सरने 1975 मध्ये सुन्नी इस्लामचा स्वीकार केला. तीस वर्षांनी त्यांनी सुफीवादाचा मार्ग स्वीकारला.
अली यांनी चार वेळा लग्न केले होते आणि त्यांना सात मुली आणि दोन मुले आहेत.
6 फूट 3 इंच उंच अली यांनी त्याच्या कारकिर्दीत 61 लढती लढल्या आणि 56 जिंकल्या. त्यांना कारकिर्दीत केवळ पाच वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.