Ban on Jamaat-e-Islami, from contesting elections. Dainik Gomantak
ग्लोबल

बांगलादेशात राजकीय राडा, सर्वात मोठ्या इस्लामिक पार्टीला निवडणूक लढवण्यास बंदी

Jamaat-e-Islami: बांगलादेशी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात असून, या निर्णयानंतर विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मोकळा झाला आहे.

Ashutosh Masgaunde

Bangladesh's Supreme Court recently upheld the ban on the country's largest Islamic party, Jamaat-e-Islami, from contesting elections:

बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच देशातील सर्वात मोठ्या इस्लामिक पक्ष, जमात-ए-इस्लामीवर निवडणूक लढवण्यास बंदी कायम ठेवली आहे. तसेच बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने जमात-ए-इस्लामीची निवडणूक लढवण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळली आहे.

बांगलादेशी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात असून, या निर्णयानंतर विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मोकळा झाला आहे.

2013 मध्ये, बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने इस्लामिक पक्ष जमात-ए-इस्लामीला देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले होते आणि निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती.

बांगलादेशमध्ये पुढील वर्षी 7 जानेवारी रोजी लोकसभा निवडणुका होणार असून, जमात-ए-इस्लामीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2013 चा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती, जी न्यायालयाने फेटाळली आहे.

सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या अपील विभागाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे मुख्य वकील वैयक्तिक कारणामुळे न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे ही सुनावणी सहा आठवड्यांनी पुढे ढकलण्याची मागणी करणारी त्यांची यापूर्वीची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी फेटाळली.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने 2009 मध्ये सत्तेवर आल्यानंतर, बांगलादेश जमात-ए-इस्लामीच्या प्रमुख नेत्यांवर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान नरसंहार आणि युद्ध गुन्ह्यांच्या कृत्यांमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी खटला चालवण्याचा प्रयत्न केला होता.

त्याचवेळी 2013 सालानंतर जमात-ए-इस्लामीच्या अनेक बड्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फाशी देण्यात आली, तर अनेक नेत्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

१९७१ च्या आंदोलनात जमात-ए-इस्लामीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला होता आणि पाकिस्तानी लष्कराने बांगलादेशात केलेल्या नरसंहारात या संघटनेची मोठी भूमिका होती. त्याचवेळी, बांगलादेशच्या निर्मितीनंतरही जमात-ए-इस्लामीचे पाकिस्तानशी अत्यंत जवळचे संबंध आहेत.

जमात-ए-इस्लामी हा माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा प्रमुख भागीदार आहे, जो अनेक दशकांपासून विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रतिस्पर्धी आहे.

कट्टरपंथी इस्लामी पक्ष जमात-ए-इस्लामी आणि खालिदा झिया यांनी मिळून 2001 ते 2006 पर्यंत बांगलादेशचे सरकार चालवले आणि त्या काळात खालिदा झिया पंतप्रधान होत्या.

या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी शेख हसीना जोरदार प्रयत्न करत आहेत, तर खलिजा झिया यांच्या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT