Bangladesh Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh Blast: बांग्लादेशातील ऑक्सिजन प्रकल्पामध्ये भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू तर 30 जखमी

बांग्लादेशातील ऑक्सिजन प्रकल्पामध्ये भीषण स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Bangladesh Oxygen Plant Blast: बांगलादेशातील दक्षिण-पूर्व भागात एका ऑक्सिजन प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी जीवितहानी झाली. या स्फोटात आतापर्यंत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 30 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात घटनास्थळापासून दोन चौरस किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतींनाही हादरा बसला आहे.

बांगलादेशातील चित्तगाँगच्या सीताकुंडा उपजिला परिसरात शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी दाखल झाले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू आहे. या स्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाल्याने मृतांची संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप माहिती पडले नाही.

बांगलादेशची सरकारी अधिकारी शहादत हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथे बचावकार्य सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्सिजन प्रकल्पाच्या आजुबाजुच्या इमारतीही हादरल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT