Bangladesh Violence Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh Violence: दीपू दासनंतर बांगलादेशात अमृत मंडलची जमावाकडून हत्या, घरे पेटवली, मंदिरे फोडली; हिंदूंवरील अत्याचाराचं सत्र सुरुच

Violence Against Hindus in Bangladesh: बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

Manish Jadhav

Violence Against Hindus in Bangladesh: बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. मैमनसिंह येथील दीपू चंद्र दास याच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता राजबाडी जिल्ह्यात अमृत मंडल उर्फ सम्राट (29) या हिंदू तरुणाची जमावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या वाढत्या हिंसाचारामुळे बांगलादेशातील हिंदू धर्मीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही यावर चिंता व्यक्त केली जात आहे.

काय आहे राजबाडीतील घटना?

पांग्शा मॉडेल पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, राजबाडी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अमृत मंडलवर स्थानिक रहिवाशांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन जमाव हिंसक झाला आणि त्यांनी अमृतला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाच्या या भीषण मारहाणीत अमृतचा जागीच मृत्यू झाला. पोलीस रेकॉर्डनुसार, स्थानिक 'सम्राट वाहिनी' नावाच्या टोळीचा नेता म्हणून अमृतची नोंद करण्यात आली होती. मात्र, ज्या प्रकारे जमावाने कायदा हातात घेऊन त्याची हत्या केली, त्यावरुन बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

घरांना आग लावण्याचे सत्र सुरुच

केवळ हत्याच नाही, तर हिंदूंच्या (Hindu) मालमत्तांना लक्ष्य करण्याचे प्रकारही वाढले आहेत. चटगाव जवळील राउजान भागात मंगळवारी एका हिंदू कुटुंबाचे घर आग लावून खाक करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच दिवसांत याच भागात सात हिंदू कुटुंबांची घरे जाळण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली असली तरी, लोकांच्या मनातील भीती कमी झालेली नाही.

दीपू चंद्र दास प्रकरण आणि सरकारची भूमिका

गेल्या आठवड्यात मौमनसिंह शहरात 28 वर्षीय दीपू चंद्र दास या हिंदू फॅक्टरी कामगाराची जमावाने हत्या केली. त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला. या घटनेनंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. वाढता रोष पाहून अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी मृताच्या कुटुंबाची (पत्नी, लहान मुल आणि आई-वडील) जबाबदारी सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले. या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

2025 मधील भयावह आकडेवारी

बांगलादेशातील 'ऐन ओ सलीश केंद्र' या मानवाधिकार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2025 या वर्षात आतापर्यंत हिंसाचारात 184 लोकांचा बळी गेला आहे. 12 डिसेंबर रोजी ढाका येथे इंक्लाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी हिंसक जमावाने 'डेली स्टार' आणि 'प्रथम आलो' सारख्या मोठ्या वृत्तपत्र कार्यालयांना आणि सांस्कृतिक संघटनांच्या कार्यालयांना आग लावली.

युनूस यांच्या कार्यालयाने एक पत्रक जारी करुन म्हटले की, "केवळ आरोप किंवा अफवांच्या आधारे हिंसाचार करणे स्वीकारले जाणार नाही." मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना आणि घरांना लक्ष्य केले जात असल्याने अंतरिम सरकार हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT