Begum Khaleda Zia Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh: मालदीवच्या वाटेवर बांगलादेश; बेगम खालिदा झिया यांच्या पक्षाने सुरु केले 'इंडिया आऊट' कॅम्पेन

Bangladesh News: बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षाने प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

Manish Jadhav

Bangladesh News: बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षाने प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. मात्र या निवडणुकीत विरोधकांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. यातच आता, सर्वात मोठा विरोधक असलेल्या बेगम खालिदा झिया यांच्या पक्षाने (बीएनपी) ही मालदीवच्या धर्तीवर 'इंडिया आउट' मोहीम सुरु केली आहे. मालदिवमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू यांनी भारत समर्थक इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला. आता खलिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्या 'इंडिया आऊट' मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम सुरु केली आहे.

युरेशियन टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) प्रमुख बेगम खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान याने इंडिया आऊट ऑपरेशन सुरु केले आहे. ते सध्या बीएनपीचे कार्यवाहक अध्यक्ष आहेत. बीएनपीच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील इंडिया आऊट मूव्हमेंट मालदीवच्या मोहिमेची आठवण करुन देत आहे, ज्यामुळे आज भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

बीएनपीने 'इंडिया आऊट' मूव्हमेंट का सुरु केले?

वास्तविक, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP हा बांगलादेशचा इस्लामिक पक्ष आहे. अमेरिकेने या पक्षाला टियर-III दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे बीएनपीने 'इंडिया आऊट' मूव्हमेंट सुरु केले आहे. यावेळी बीएनपीचे कार्यकर्ते 'भारत बांगलादेशचा मित्र नाही आणि भारत बांगलादेशचा नाश करत आहे' अशा घोषणा देत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर BNP कार्यकर्ते भारतविरोधी घोषणा पोस्ट करुन भावना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियाच्या मदतीने भारतविरोधी मूव्हमेंट नेपाळमध्ये नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

भारत-बांगलादेश संबंध बिघडवण्याचा प्रयत्न

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) कार्यकर्त्यांनी भारतावर आरोप करत भारत आमचा मित्र नसल्याचे म्हटले आहे. 1971 मध्ये ते आम्हाला मदत करायला आले नव्हते. इथे येऊन त्यांनी बंगाली लोकांच्या मौल्यवान वस्तू लुटल्या, असे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT