china runners 
ग्लोबल

धक्कादायक! खराब हवामानामुळे 21 चिनी धावपटूंचा मृत्यू

दैनिक गोमंतक

बीजिंग: खराब हवामानामुळे, चीनमध्ये 21 धावपटूंनी (China Runners) आपला जीव गमावला, तर एक अद्याप बेपत्ता आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की गारपीट, बर्फवृष्टी आणि अतिवृष्टी व वारा यामुळे चीनमधील 100 किलोमीटरच्या क्रॉस-कंट्री पर्वतरांग शर्यतीत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्य प्रसारक सीसीटीव्हीने स्थानिक बचाव आदेश मुख्यालयाच्या हवाल्याने सांगितले की, हरवलेला धावपटू सकाळी 9.३० वाजता सापडला होता, परंतु त्याचे सर्व अवयव बंद पडले होते. (Bad weather kills 21 runners in China)

बायिन शहरातील (Baiyin City) अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "वायव्य गांसु प्रांतातील बायिन शहरालगतच्या येलो नदीच्या उंच वाळवंटात आयोजित शर्यतीत अचानक हवामान खराब झाले. बायिन सिटीचे नगराध्यक्ष झांग झुचेन म्हणाले, "दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या आपत्तीग्रस्त वातावरणाचा परिणाम 20 ते 31 किलोमीटर दरम्यानच्या शर्यतीच्या उंच भागात अचानक झाला. स्थानिक भागात गारपीट आणि बर्फवृष्टी सुरू झाली आणि जोरदार वारे वाहू लागले. यामुळे तापमानात अचानक घट झाली." पुढे ते म्हणाले ''काही सहभागींकडून मदतीचा संदेश मिळाल्यानंतर मॅरेथॉन आयोजकांनी बचाव दल पाठविला जे 18 सहभागींना वाचविण्यात यशस्वी झाले. झांग म्हणाले की, दुपारी अडीचच्या सुमारास हवामानाची परिस्थिती अचानक बिघडली. यामुळे ही शर्यत त्वरित रद्द करण्यात आली. परिस्थिती पाहून स्थानिक अधिका्यांनी तातडीने मदतीसाठी बचाव पथके पाठविली.

झांग यांनी पुढे सांगितले इतर आठ धावपटूंवर किरकोळ दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने यापूर्वी हवामानामुळे काही धावपटूंना हायपोथर्मियाचा त्रास होत असल्याचे वृत्त दिले होते. बातमी एजन्सीने सांगितले की डोंगराळ भागातील तापमानात रात्रभर आणखी घट झाली, त्यामुळे शोध आणि बचावकार्य अधिक कठीण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT