Baba Vanga Prediction on Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

पुतिन संपूर्ण जगावर राज्य करणार का? काय सांगते बाबा वेंगांची 'ही' भविष्यवाणी!

रुसो-युक्रेन युद्धाच्या दरम्यान, बल्गेरियाचे बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Baba Vanga Prediction on Vladimir Putin : युक्रेन एक महिन्यापासून सतत रशियावर हल्ला करत आहे. रुसो-युक्रेन युद्धाच्या दरम्यान, बल्गेरियाचे बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बाबा वेंगा यांनी अमेरिकेतील अल कायद्याचा 9/11चा हल्ला आणि त्सुनामी वादळाचे अचूक भाकीत केले होते. त्यांनी 23 वर्षांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलही भविष्यवाणी केली होती.

रशिया जगावर राज्य करेल

बाबा वेंगा यांनी 1979 मध्ये लेखक व्हॅलेंटीन सिदोरोव्ह यांना व्लादिमीर पुतिन यांचा झेंडा जगभर फडकणार असल्याचे सांगितले होते. पुतीन (Russia President Vladimir Putin) यांच्या देखरेखीखाली रशिया संपूर्ण जगावर राज्य करेल. ते म्हणाले होते की, रशिया "जगाचा शासक" बनेल आणि युरोप ओसाड प्रदेशामध्ये बदलेल. युरोप कमकुवत झाल्यानंतर जगावर रशियाचे राज्य असेल.

बाबा वेंगा यांनी युक्रेनवर रशियन हल्ल्याचीही भविष्यवाणी केली होती. रशियासमोर कोणीही टिकू शकणार नाही, असे ते म्हणाले होते. रशियाला कोणीही रोखू शकत नाही. रशिया मार्गात उभ्या असलेल्या सर्व शक्तींचा नाश करेल आणि एक वेळ अशी येईल जेव्हा रशिया जगाचा स्वामी बनेल. रशिया ही जगातील एकमेव महासत्ता असेल.

85 टक्के अंदाज बरोबर!

याआधी त्यांनी नैसर्गिक आपत्तींचे भाकीत केले होते. तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या संघर्षांबाबत इशारा दिला होता. जागतिक घडामोडी आणि मानवजातीच्या स्थितीबाबत त्यांनी केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. त्यापैकी ISIS चा उदय आणि ट्विन टॉवर्सच्या पडझडीचे भाकीत आजपर्यंत चर्चेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, त्यांचे 68 टक्के अंदाज खरे ठरले आहेत. त्याचवेळी बाबा वेंगाचे (Baba Venga) 85 टक्के भाकीत खरे ठरल्याचा दावा त्यांच्या अनुयायांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT