पाकिस्‍तानी संगीत निर्मात्‍याने मासिक पाळीवर केले भाष्य... युजर्स म्हणाले, त्याला गर्भाशय आहे का विचारा

नुकतेच एका पाकिस्तानी गायकाने पीरियड्सवर काही ट्विट केल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
Menstruation
MenstruationDainik Gomantak

मासिक पाळी बद्दल बोलणे आजच्या काळात सामान्य झाले आहे. पूर्वीच्या काळी लोक महिलांच्या मासिक पाळीबद्दल बोलायला लाजायचे, पण आता लोक सोशल मीडियावर महिलांच्या या समस्येबद्दल बोलताना दिसतात. अनेक मोठे सेलिब्रिटी पीरियड्सवर बोलतानाही दिसले आहेत. मात्र, नुकतेच एका पाकिस्तानी गायकाने पीरियड्सवर काही ट्विट केल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

पाकिस्तानचे प्रसिद्ध संगीत निर्माते रोहेल हयात (Rohail Hyatt) यांनी मासिक पाळीबाबत वक्तव्य केले आहे, जेव्हा ट्विटरवर काही महिला मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या असह्य वेदना आणि हार्मोन्समधील बदलांबद्दल बोलत होत्या. तेव्हा रोहेलने त्यावर कमेंट करत आपले मत व्यक्त केले. एका महिला यूजरने लिहिले की, 'आम्ही महिलांच्या आयुष्यात हार्मोन्समुळे होणाऱ्या मानसिक आणि भावनिक बदलांबद्दल बोलत नाही. आमच्या डोळ्याच कधी कधी नकळत पाणी येत.'

यावर भाष्य करताना, रोहेलने लिहिले - या दुःख आणि वेदनामागील मानसिक कारणे समजून घेणे आणि अनुभवणे खूप महत्वाचे आहे. मानवजातीचा स्वभाव असा आहे की त्याला नेहमीच आपले अस्तित्व बळकट करायचे असते. अशा परिस्थितीत मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात तयार झालेली अंडी नष्ट झाल्याने दुःखाची भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत ही प्रक्रिया स्वीकारली तरच महिलांना या दु:खाशी लढण्याची ताकद मिळू शकेल.'

मासिक पाळीच्या दरम्यान महिलांचे शरीर आणि त्यांना होणाऱ्या समस्या सांगितल्यामुळे रोहेलला खूप ट्रोल केले जात आहे. रोहेलने पीएमएस दरम्यान होणाऱ्या मूड स्विंगमध्ये हार्मोनल असंतुलनाच्या भूमिकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याच्या ट्विटवर मारिया अमीर या युजरने लिहिले - पुरुषाने महिलांना मासिक पाळीविषयी माहिती देणे सर्वात हास्यास्पद आहे. उत्तरात रोहेलने लिहिले, 'का नाही? महिलांची तक्रार आहे की पुरुषांना महिलांच्या समस्या समजत नाहीत पण जेव्हा कोणी त्याची काळजी घेत असेल तेव्हा तुम्ही त्याच्यावर हल्ला करत आहात.'

Menstruation
मासिक पाळी अनियमित येण्याची 5 प्रमुख कारणे

रोहेलने पुढे लिहिले की, 'मी वेदनांच्या मानसिक पैलूबद्दल बोलत आहे. प्रत्येक वेदना शांत मनाने सहन करता येते. जेव्हा तुम्ही एखादी समस्या स्वीकारता तेव्हा तुम्हाला मनःशांती मिळते. स्वीकृती कोणत्याही अनुभवाचा गुलाम होण्याऐवजी त्यावर नियंत्रण ठेवण्यास शिकवते.'

रोहेलच्या ट्विटवर एका युजरने कमेंट केली की, वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या महिला त्यांच्या मासिक पाळीच्या अनुभवांबद्दल बोलत आहेत. त्याच वेळी, अंडाशय आणि वैद्यकीय अनुभवाशिवाय, काही लोकं मासिक पाळीबद्दल ज्ञान देत आहेत. त्याच वेळी, एका वापरकर्त्याने विचारले की त्याला गर्भाशय आहे का? यावर रोहेलने उत्तर दिले - 'नाही पण आम्ही तिथूनच आलो आहोत'. या संपुर्ण संवादा दरम्यान रोहेलने सोशल मिडियावर आपले मत मांडण्याचा पुर्ण प्रयत्न केला. त्यावर काही महिला आणि युजर्जनी त्याला प्रचंड ट्रोल केले.

Menstruation
मासिक पाळी दरम्यान होतोय खूप त्रास, तर 'या' आयुर्वेदिक टिप्स करा फॉलो

मात्र, रोहेलला सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका ट्विटमध्ये त्याने गरीब असणे कठीण आहे पण श्रीमंत होणे त्याहूनही कठीण आहे, असे लिहिले होते. त्याच्या या विधानावरून देखील त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com