Baba Vanga
Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga Prediction: कोण होत्या बाबा वेंगा! ज्यांच्या भाकितांनी उडवली जगाची झोप

दैनिक गोमन्तक

Baba Vanga Upcoming Predictions: गेल्या काही वर्षांमध्ये जगात अंदाज ऐकण्याचा आणि वाचण्याचा ट्रेंड वाढला आहे. यातील अनेक भाकिते बल्गेरियाच्या 'बाबा वेंगा' यांनी वर्तवली आहेत. बाबा वेंगा कोण होत्या? तत्पूर्वी त्यांनी येणाऱ्या संकटांबद्दल काय सांगितले होते? खरे तर, 2022 वर्ष संपायला जवळपास 85 दिवस उरले आहेत, त्यामुळे त्यांच्या भाकितांवर विश्वास ठेवणाऱ्यांची धडकी वाढली आहे.

बाबा वेंगा कोण होत्या?

पाश्चात्य देशांतील मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा (Baba Vanga) या एक फकीर होत्या, ज्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हत्या. त्या बल्गेरियाच्या रहिवासी होत्या. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. मात्र वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे 85 टक्के अंदाज खरे ठरले आहेत, मात्र त्यांचे काही दावे चुकीचेही सिद्ध झाले आहेत. असे म्हणतात की, त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या कोठेही लिहिलेल्या नाहीत, परंतु या भविष्यवाण्या बाबा वेंगा यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितल्या आणि त्यांनी त्या लिहिण्याचे काम केले.1996 मध्ये बाबा वेंगा यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांनी 5079 पर्यंत भाकीते केली होती, कारण त्यांच्या मते हे जग 5079 मध्ये संपेल.

2022 साठी हा अंदाज

'द सन'च्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी एकूण 6 भाकिते वर्तवली होती. त्यापैकी आतापर्यंत 2 भाकिते जवळपास खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी 2022 साठी भाकीत केले होते की, '2022 मध्ये एक भयंकर विषाणू येईल जो जगाची झोप उडवेल.'

त्यांनी पुढे सांगितले की, 'जगासमोर अनेक नैसर्गिक आपत्ती असतील, ज्या गेल्या 9 महिन्यांत काही देशांमध्ये दुष्काळ, पूर आणि त्सुनामीच्या रुपात दिसल्या आहेत. ऑस्ट्रेलियात (Australia) पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर पाकिस्तानमध्येही (Pakistan) नुकत्याच आलेल्या पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.' याशिवाय, अनेक शहरांमध्ये पाणीटंचाईचे भाकीतही खरे ठरले आहे. याशिवाय बाबा वेंगा यांनी एलियन आक्रमण, टोळ आक्रमण आणि आभासी वास्तवात वाढ होण्याचीही भविष्यवाणी केली होती.

हे भाकीत 2021 साठी करण्यात आले होते

बाबा वेंगा यांनी वर्तवल्याप्रमाणे, 2021 मध्ये टोळ पिकांवर हल्ला करतील. 2021 मध्ये प्रत्यक्षात देशातील अनेक राज्यांमध्ये टोळांनी हल्ला करुन लाखो एकरातील उभे पीक नष्ट केल्याचे तुम्ही पाहिले असेल. याशिवाय, त्यांनी जगासाठी अनेक भाकिते केली होती, ज्यापैकी काही खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी 2004 मध्ये त्सुनामीची भविष्यवाणी केली होती ती ही खरी ठरले, असे सांगण्यात येत आहे.

हा अंदाज पन्नास टक्के खरा ठरला

अमेरिकेचे (America) 44 वे राष्ट्राध्यक्ष कृष्णवर्णीय असतील आणि ते शेवटचे राष्ट्राध्यक्ष असतील, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती. याविषयी त्यांचे अर्धेच भाकीत खरे ठरले कारण अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा झाले, जे कृष्णवर्णीय होते. परंतु ते शेवटचे राष्ट्राध्यक्ष नव्हते. त्यांच्यापाठोपाठ डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले आणि सध्या जो बायडन यांच्या हातात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT