Muhammad Yunus  Dainik Gomantak
ग्लोबल

बांगलादेशचे अंतरिम सरकार अडचणीत! शेख हसीना यांच्या पक्षाची आंतरराष्ट्रीय फौजदारी कोर्टात धाव; वाचा नेमंक प्रकरण?

International Criminal Court: शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून तीन महिने उलटले तरी तेथील राजकीय स्थिती अद्याप स्थीर नाहीये.

Manish Jadhav

International Criminal Court: शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून तीन महिने उलटले तरी तेथील राजकीय स्थिती अद्याप स्थीर नाहीये. यातच आता, शेख हसीना यांच्या पक्षाने (अवामी लीग) नेदरलँड्सस्थित आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात (ICC) अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि अन्य 61 जणांविरुद्ध धाव घेतली आहे.

'आंदोलनाच्या नावाखाली क्रूर हत्याकांड'

अवामी लीगचे नेते आणि सिल्हेटचे माजी महापौर अन्वरझ्झमन चौधरी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करुन सांगितले की, "बांगलादेशमध्ये 5 ते 8 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली एक क्रूर हत्याकांड घडले, ज्यामध्ये अवामी लीगचे नेते-कार्यकर्ते आणि त्यांचे विविध सहकारी तसेच, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आणि बांगलादेशी पोलिस दलांना लक्ष्य करण्यात आले. आम्ही यासंदर्भातील सर्व पुरावे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात सादर केले आहेत."

800 पानांचा दस्तऐवज आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाठवला

मोहम्मद युनूस यांच्या व्यतिरिक्त आरोपींमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आंदोलक विद्यार्थी नेते यांचा समावेश आहे. व्हिडिओ संदेशात चौधरी यांनी पुढे सांगितले की, ''त्यांनी आयसीसीकडे केलेल्या तक्रारीत सुमारे 800 पानांचा दस्तऐवज पाठवला आहे.'' लवकरच आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात आणखी 15 हजार तक्रारी दाखल होतील, त्यासाठी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता या हिंसाचारातील पीडित महिला एकामागून एक तक्रारी दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अवामी लीगला रॅली काढण्याची परवानगी नाही

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शनिवारी (9 नोव्हेंबर 2024) अवामी लीगला 'फॅसिस्ट' म्हणून संबोधले. सरकारकडून सांगण्यात आले की, ते रविवारी (10 नोव्हेंबर 2024) होणारी प्रस्तावित अवामी लीगच्या रॅलीला परवानगी देणार नाहीत. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, अंतरिम सरकार कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन करणार नाही.

आलम यांनी इशारा दिला की, "जो कोणी सामूहिक हत्याकांड आणि हुकूमशहा शेख हसीना यांचा संदेश घेऊन रॅली, सभा आणि मिरवणुका काढण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT