Australia Travel  Dainik Gomantak
ग्लोबल

ऑस्ट्रेलिया दोन वर्षांनंतर उघडणार पर्यटकांसाठी आपले दरवाजे

देशात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना कोरोना विषाणूविरूद्ध संपूर्ण लसीकरण करणे अनिवार्य आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियन सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सीमा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सोमवारी जाहीर केले की देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा 21 फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी पुन्हा उघडल्या जातील. मात्र, देशात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना कोरोना (Corona) विषाणूविरूद्ध संपूर्ण लसीकरण करणे अनिवार्य आहे. (Australia Travel Latest News Update)

मॅरिसन म्हणाले, "मला माहित आहे की यामुळे पर्यटन उद्योगाला मोठा आनंद मिळेल." पुढील दोन आठवड्यांत, त्यांना देशातील पर्यटकांच्या ओघाचा फायदा होईल आणि पुन्हा ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होण्याची संधी मिळेल. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी हे वक्तव्य केल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियाने दिले आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले की 21 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात प्रवेश करणाऱ्या लोकांना दुहेरी लसीकरणाची आवश्यकता असेल.

ऑक्टोबर महिन्यात त्यांनी सांगितले होते की, परदेशी लोकांच्या प्रवेशासाठी सीमा खुल्या करण्याची योजना आखली जात आहे. हे 2022 मध्ये होईल, असा अंदाज त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास दोन वर्षांनी देशात पर्यटन परत येणार आहे.

परदेशात अडकलेले सर्व नागरिक

या कठोर सरकारी नियमामुळे अनेक नागरिक परदेशात अडकून पडले आहे, काहींना कुटुंबापासून वेगळे राहण्यास भाग पाडले आहे, देशाच्या अब्ज डॉलरच्या पर्यटन उद्योगाला खीळ बसली आहे आणि आधुनिक आणि मुक्त राष्ट्र म्हणून ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठेबद्दल वादविवाद सुरू झाले आहेत. ऑस्ट्रेलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या म्हणण्यानुसार, सीमा बंद झाल्यामुळे व्यापारात दर महिन्याला 2.6 अब्ज डॉलरचे नुकसान होते. अलिकडच्या काही महिन्यांत, ऑस्ट्रेलियन, दीर्घकाळचे रहिवासी आणि विद्यार्थ्यांसाठी नियम सुलभ करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT