Hindu Temple In Canada Dainik Gomantak
ग्लोबल

Hindu Temple: कॅनडातील हिंदू मंदिरांवर हल्ला करणारा गजाआड; दानपेटीही लुटायचा जगदीप पंधेर!

Hindu Temple In Canada: कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात गेल्या काही महिन्यांत हिंदू मंदिरांवर अनेक हल्ले झाले आहेत.

Manish Jadhav

Hindu Temple In Canada: कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात गेल्या काही महिन्यांत हिंदू मंदिरांवर अनेक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमुळे देशात धार्मिक तणावही वाढला. आता याप्रकरणी कारवाई करत कॅनडाच्या पोलिसांनी 41 वर्षीय जगदीश पंधेर यांना अटक केली आहे. पंधेर हे ग्रेटर टोरंटो भागात ब्रॅम्प्टन येथे राहतात. त्यांच्यावर अनेक आरोपांनुसार खटले प्रलंबित असून सध्या ते जामिनावर बाहेर होते. गेल्या वर्षीही त्यांनी काही प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, 8 ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीला हिंदू मंदिरात प्रवेश करताना सुरक्षा पाळत ठेवण्यात आली होती.

दरम्यान, यानंतर तो मंदिराचे नुकसान करतो आणि तिथे ठेवलेल्या दानपेटीतील मोठी रोकड घेऊन निघून जातो. तो मंदिरात जात असल्याचे फुटेजमध्ये दिसत होते. यानंतर चौकशीला गती दिली असता याच व्यक्तीने अनेक मंदिरांमध्ये अशाच घटना घडवल्याचे उघड झाले. डरहम आणि ग्रेटर टोरंटो येथील अनेक मंदिरांमध्ये त्याने अशीच कृत्ये केली होती. या घटना मंदिरांमध्ये घडल्या असल्या तरी त्यांना द्वेषमूलक गुन्हे किंवा द्वेषातून घडलेल्या घटना म्हणता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सप्टेंबरपासून ओंटारियोमध्ये किमान सहा मंदिरांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हा मुद्दा हिंदू समाज सातत्याने मांडत आहे. आतापर्यंत नुकसान झालेल्या मंदिरांमध्ये पिकरिंगमधील देवी मंदिर, अजाक्समधील संकट मोचन मंदिर आणि ओशावा येथील हिंदू मंदिराचा समावेश आहे. याशिवाय, ग्रेटर टोरंटोमध्येही तीन मंदिरांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 2021 मध्येही अशा काही घटना घडल्या. अशी एकूण 18 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापूर्वी मार्च 2022 मध्येही हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. मार्चमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या लोकांपैकी जगदीप पंधेर हा एक होता. याशिवाय, गुरशरणजीत धिंडसा, परमिंदर गिल आणि गुरदीप पंधेर यांनाही अटक करण्यात आली आहे. या लोकांनी मुख्यतः हिंदू मंदिरांचे नुकसान केले. याशिवाय, जैन मंदिरे आणि गुरुद्वारांची तोडफोड आणि लूटही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT