Canada: भारतीय विद्यार्थ्यांना मोठा झटका! कॅनडामध्ये शिक्षण महागलं; ट्रूडो सरकारने दुप्पट केला स्टुडंट फंड

Canada Government Double Student Fund: मागील काही दिवसांपासून भारत-कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
Canada Government Double Student Fund
Canada Government Double Student FundDainik Gomantak
Published on
Updated on

Canada Government Double Student Fund: मागील काही दिवसांपासून भारत-कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यातच आता, कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय विद्यार्थ्यांना आता कॅनडामध्ये शिक्षण घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण ट्रुडो सरकारने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. अशा परिस्थितीत आता विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काव्यतिरिक्त आणखी पैशांची गरज भासणार आहे. कॅनडाचा स्टडी व्हिसा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या 10 हजार डॉलर्सची आवश्यकता आहे. मात्र आता एका विद्यार्थ्याला त्याच्या खात्यात 20 हजार 635 डॉलर्सची रक्कम दाखवावी लागणार आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यासोबत कुटुंबातील सदस्यही आल्यास 4 हजार डॉलर्सची अतिरिक्त व्यवस्था करावी लागणार आहे.

पंजाबींनी विरोध सुरु केला

दरम्यान, घरांच्या संकटानंतर कॅनडाच्या सरकारने हे पाऊल उचलले आहे. जेणेकरुन कॅनडामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवता येईल. सध्या 8 लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थी कॅनडामध्ये शिकण्यासाठी येतात. त्यापैकी 3 लाख 20 हजार फक्त भारतातील आहेत. या विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के विद्यार्थी फक्त पंजाबचे आहेत. गुरुवारी कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर म्हणाले की, सप्टेंबर 2024 पूर्वी व्हिसावर मर्यादा घालण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत.

Canada Government Double Student Fund
India-Canada: कॅनडात पुन्हा दिसला भारत द्वेष, हिंदी चित्रपट दाखवणाऱ्या तीन थिएटरमध्ये हल्ले

कॅनडा या समस्यांना तोंड देत आहे

ओटावा येथील पार्लमेंट हिल येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना इमिग्रेशन मंत्री म्हणाले की, 'कॅनडा सरकार फसवणूक, शोषण आणि गृहनिर्माण यांसारख्या समस्यांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.' दुसरीकडे, तिथे स्थायिक झालेले पंजाबी या धोरणाला विरोध करत आहेत. स्टुडंट फंड दुप्पट करुन या समस्यांवर मात करता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आपली जबाबदारी टाळण्यासाठी सरकार संपूर्ण भार परदेशी विद्यार्थ्यांवर टाकत आहे, असेही ते त्यांचे म्हणणे आहे.

Canada Government Double Student Fund
Canada: दहशतवादी पन्नूच्या धमकीवर कॅनडाची मोठी कारवाई; मंत्री म्हणाले, ''लोकांनी घाबरु नये...''

कॅनडा मध्ये गृहनिर्माण संकट

मंत्री मिलर पुढे म्हणाले की, ''परदेशी विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कॅनडामध्ये गृहनिर्माण संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने परदेशी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आमंत्रित करणे ही मोठी चूक ठरेल. अशा परिस्थितीत, कॅनडामधील शैक्षणिक संस्थांनी शिक्षणासाठी येणाऱ्या केवळ तेवढ्याच विद्यार्थ्यांना व्हिसा द्यावा, जेणेकरुन त्यांना राहण्यासाठी घर मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com