Police Dainik Gomantak
ग्लोबल

Hindu Temple In Pakistan: 'पाकिस्तानात हिंदूंच्या मंदिर आणि घरांवर हल्ले...,' सुरक्षेसाठी हाय अलर्ट जारी!

Pakistan: पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू मंदिरे आणि जवळपासच्या हिंदू कुटुंबांवर हल्ल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले.

Manish Jadhav

Hindu Temple In Pakistan: पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू मंदिरे आणि जवळपासच्या हिंदू कुटुंबांवर हल्ल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले. या आठवड्यात, पाकिस्तानातील कराचीमध्ये 150 वर्ष जुन्या हिंदू मंदिरावर हल्लेखोरांनी रॉकेट लाँचरने हल्ला केला. या प्रकरणी सिंध प्रांत सरकारनेही आपल्या वतीने निवेदन दिले आहे.

पाकिस्तानच्या सिंध सरकारने म्हटले आहे की, 'ते धार्मिक स्थळ पाडण्याचे आणि त्याच्या जागी कोणत्याही प्रकारचे कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याची परवानगी देणार नाही, जरी ते अल्पसंख्याक समुदायाचे असले तरीही.'

दुसरीकडे, हिंदू मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर हल्ले होत असताना, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू मंदिरांच्या सुरक्षेबाबत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, या आठवड्यात पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतात हल्लेखोरांनी हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला केल्यानंतर, अधिकाऱ्यांनी प्रांतातील मंदिरांच्या सुरक्षेसाठी हाय अलर्टचे आदेश दिले. त्याचबरोबर, 400 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले.

ध प्रांतातील कश्मोर भागात रविवारी हल्लेखोरांनी मंदिर आणि जवळपासच्या हिंदू घरांवर हल्ला केला. सिंधचे पोलिस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी प्रांतातील मंदिरांच्या सुरक्षेसाठी हाय अलर्टचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिओ न्यूज पोर्टलने दिली आहे.

400 पोलिस तैनात करण्यात आले

अहवालात अधिकार्‍यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, मंदिरांच्या सुरक्षेसाठी 400 पोलिस कर्मचारी जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारणास्तव पोलिस कर्मचारी कर्तव्ये पार पाडतील.

सिंधचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) गुलाम नबी मेमन यांनी हिंदूंना मंदिरांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, प्रांतात राहणार्‍या अल्पसंख्याक आणि इतर समुदायांचे संरक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

काश्मोर-कंधकोट पोलिसांनी (Police) सोमवारी मंदिरांवरील हल्ल्याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध दहशतवाद विरोधी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी गौसपूर पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शोध मोहीम सुरु करण्यात आली असून दोषींना पकडण्यात येईल.

हिंदू समाजाला धोका पोहोचवू नये...

ते म्हणाले की, गौसपूर शहरात शतकानुशतके जुने मंदिर असून, त्याची सुरक्षा पोलिसांनी चोख बजावली आहे. सिंधचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री ग्यानचंद इसरानी यांनी प्रांतातील हल्लेखोरांना गेल्या अनेक शतकांपासून या प्रदेशात शांततेत राहणाऱ्या हिंदू समाजाला धोका पोहोचवू नये, असे आवाहन केले आहे. सोमवारी विधानसभेच्या सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी हे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: अखेर त्या महिलेचा मृतदेह सापडला!

IFFI 2024: घरबसल्या बघा 'इफ्फी'चा सोहळा! Live Streaming साठी प्रसारभारतीने दिली 'ही' खास सुविधा..

Bhandari Community In Goa: भंडारी समाजाच्या नव्या समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस; वाद महिनाभर राहणार प्रलंबित

C K Nayudu Trophy: गोव्याच्या सलामीवीरांची झुंझार फलंदाजी! अझानचे शानदार शतक; सामना अनिर्णित राखण्यात यश

Morjim: मोरजीत 'कॅसिनो'ला थारा नाही! आमदार आरोलकरांचा स्थानिकांना पाठिंबा; परवाने मागे घ्‍यायची मागणी

SCROLL FOR NEXT