अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पुन्हा एकदा मशिदीला लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला आहे. ज्यात 50 लोकांचा मृत्यू झाला असून 90 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तालिबानी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कुंदुज शहरात (Kunduz) शुक्रवारच्या नमाजादरम्यान शिया मशिदीवर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, जेव्हा ते प्रार्थना करत होते, तेव्हा त्यांनी स्फोटाचा मोठा धमाका ऐकला. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुहाजिद (Jabihulla Muhajid) म्हणाले, "आज दुपारी राजधानी कुंदुजच्या बंदर खान आबाद जिल्ह्यातील आमच्या शिया देशबांधवांच्या मशिदीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. परिणामी आमच्या काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे." कुंदुजमधील लोकांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, शुक्रवारच्या नमाज दरम्यान शिया मशिदीत मोठा स्फोट झाला.
रक्ताने माखलेला मृतदेह
सोशल मीडियावर शेअर केलेल्या ग्राफिक इमेजमध्ये रक्ताने माखलेले अनेक मृतदेह जमिनीवर पडलेले दिसतात. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये महिला आणि मुलांसह पुरुष इतरांना घटनास्थळापासून दूर घेऊन जाताना दिसत आहेत. आम्ही हे फोटो आणि व्हिडिओ स्वतंत्रपणे सत्यापित करु शकत नाही. कुंदुज सेंट्रल हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, 35 लोकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जखमी झाले आहेत.
काबूलमध्येही मशिदीवर हल्ला झाला
सुमारे पाच दिवसांपूर्वी काबूलमधील एका मशिदीच्या गेटवर जीवघेणा बॉम्ब स्फोट झाला. यामध्ये अनेक नागरिक मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी इसिस-के हल्ले म्हणजेच इस्लामिक स्टेट-खोरासनने घेतली आहे. ही इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेची अफगाणिस्तान शाखा आहे. तालिबानला लक्ष्य करुन हा हल्ला करण्यात आला. दरम्यानच तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांच्या आईच्या मृत्यूनंतर सुमारे एक आठवड्यानंतर येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. लोकांचे जेवण झाल्यानंतर मशिदीच्या गेटवर हल्ला झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.